पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर यांचा राजीनामा मागणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे — आमदार देवेंद्र भुयार

1398
पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर यांचा राजीनामा मागणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे — आमदार देवेंद्र भुयार
मोर्शी तालुका प्रतिनिधी :
     पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर यांना एका स्थानिक न्यायालयाचा ८ वर्षांनंतर निकाल लागताच भाजप ने आपले सुडाचे राजकारण करणे सुरू केले असल्याचा आरोप मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी केला आहे. पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर यांचा राजीनामा मागतांना भाजप चे राज्यातील जेष्ठ व जिल्हयातील स्थानिक नेत्यांनी उत्तर प्रदेश मधील योगी आदित्यनाथ सरकार काळात होत असलेल्या बहुजनांवरील अत्याचार , बलात्कार हत्यावर  गप्प का आहेत? भाजप चे केंद्रीय गृहमंत्री स्वतः तडीपार आहेत, आ.सुधाकर परिचारिक यांनी शहिदांच्या पत्नींचा अपमान केला तेंव्हा सुद्धा गप्प होते, आ.राम कदम जेंव्हा मुली पळवून आणू म्हणतो तेंव्हा गप्प , फडणवीस यांच्या सभेतून  शेतकऱ्यांना हाकलन्याचा प्रकार घडला तरीही भारतीय जनता पार्टी गप्प आहे  यावरून आमदार देवेंद्र भुयार यांनी भारतीय जनता पक्षाला स्वतः आत्मपरीक्षण करन्याचा सल्ला दिला आहे.
पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर यांच्यावर कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप नाही त्यांनी काही भ्रष्टाचाराचा गुन्हा केला नाही राजकिय जीवनात जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कधी कधी काही मुजोर अधिकारी कर्मचाऱ्यांशी वाद होत असतात त्यामुळे भारतीय जनता पार्टीने त्यांच्या भाजप काळात झालेल्या जलयुक्त शिवार योजनेच्या भ्रष्ट्राचाराबाबत बोलावं एवढंच म्हणतोय.
न्याय व्यवस्थेचा आदर ठेवत, कायदेशीरच पद्धतीने, या निर्णर्याला निर्भिडपणे सामोऱ्या जाणाऱ्या , जबाबदार महिला व बालकल्याण मंत्री यशोमतीताई ठाकूर यांनी आपली नैतिकता जपल्याबद्दल त्यांच अभिनंदन करतो. यूपी सरकारच्या खेटराखाली तिथली पोलिसांची होणारी कुचंबना, व सरकारी गुंडागर्दी बघता,  पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी जपलेली माणुसकी निश्चितच अभिनंदनीय वाटते .
पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर यांच्या विरुद्ध राजकीय आकसातून सुरू झालेल्या या प्रकरणात निदान शेवटीतरी नैतिकतेचा न्याय होईल हे निश्चितच ‘मन चंगा तो, कटोरी मे गंगा’ या उक्तिवर भारतीय जनता पार्टीने विश्वास ठेवन्याचा सल्ला आमदार देवेंद्र भुयार यांनी भारतीय जनता पार्टीला दिला.