नो मास्क… नो सवारी..नो राईडचे उलंघन करणाऱ्या ऑटो व दुचाकी चालकांवर दंडात्मक कारवाई

376

नागरिकांनी स्वतः हुन निर्देश पाळण्याचे शहर वाहतूक शाखेचे आवाहन

अकोलाःप्रतिनिधी
अकोला शहरात ऑगस्ट आणि सप्टेंबर ह्या महिन्यात कोरोनाचा कहर सुरू झाल्या नंतर कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी गर्दीचे ठिकाणे हेरून पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती मोनिका चव्हाण, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम ह्यांचे मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक पोलीस निरीक्षक गजानन शेळके व त्यांचे कर्मचाऱ्यांनी नो मास्क नो सर्व्हिस हा उपक्रम सुरू केला आहे.,त्या अंतर्गत नो मास्क नो पेट्रोल, नो मास्क नो बुक्स, नो मास्क नो राशन असे उपक्रम सुरू केले व त्या नंतर शहरातील चालणाऱ्या ऑटोची प्रचंड संख्या लक्षात घेता नो मास्क नो सवारी ही मोहीम 25।9।20 पासून सुरू करून त्या अंतर्गत ऑटो चालकाला व प्रवाशांना मास्क आवश्यक करून त्या बाबत ऑटो चालकांचे प्रत्येक ऑटो स्टँड वर जाऊन प्रबोधन केलेतसेच नो मास्क नो सवारी, माझे कुटुंब माझी जबाबदारी असे स्लोगन लिहलेली पोस्टर्स चिपकविण्याची मोहीम सुरू करून आता पर्यंत जवळपास 3000 ऑटोवर असे पोस्टर्स चिपकविले असून निर्देश न पाळणाऱ्या ऑटो चालकांवर आता पर्यंत एकूण 758 दंडात्मक कारवाया केल्या आहेत,तसेच मास्क न घालता दुचाकी चालविणाऱ्या एकूण 1425 दुचाकीवर आता पर्यंत शहर वाहतूक शाखेने दंडात्मक कारवाया केल्या आहेत, तसेच विविध संघटनांनी पुढाकार घेऊन दिलेल्या जवळपास 2000 मास्क चे वितरण सुद्धा शहर वाहतूक शाखेने केले आहे.

दंडात्मक कारवाया करणे किंवा महसूल जमा करणे हा उद्देश नसून कोरोनाचे संक्रमण पुन्हा वाढू नये म्हणून गर्दीच्या ठिकाणी सर्व सामान्य नागरिकांना मास्क घालण्याची सवय लागावी हा ह्या मोहिमे मागील उद्देश असल्याचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी सांगितले.

जाहिरात