SGBAU ONLINE परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना लॉग इन करण्यात मोठ्या प्रमाणात अडचणी – अखिल भारतीय विद्यार्थी परिषद च्या वतीने निवेदन

0
623
Google search engine
Google search engine

 

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ मध्ये आज दिनांक २०/१०/२०२० रोजी झालेल्या परीक्षे मध्ये विद्यार्थ्यांना लॉग इन करण्यात मोठ्या प्रमाणात अडचणी आल्या असुन अनेक विद्यार्थी त्यांच्या नीश्चीत वेळेत लॉग इन करु शकले नाहीत.तरी या विद्यार्थ्यांच दिवसभरात लॉगइन न झाल्यास जर विद्यार्थी परीक्षे पासून वंचीत राहील्यास त्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळावी व तसेच या पुढे या अनूशंघाने या अ‍ॅप मध्ये सुधारणा करण्यात यावी.अशी मागणी या वेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद,अमरावती महानगर तर्फे महानगरमंत्री सौरभ लांडगे यांच्या नेतृत्वात सं.गा.बा.अमरावती विद्यापीठाच्या मा.कुलगुरु यांच्या कडे करण्यात आली.
मा.कुलगुरु यांच्याशी चर्चा केल्यानंतर कुठलाही विद्यार्थी परिक्षेपासून वंचीत न रहावा ही मागणी मा.कुलगुरु यांनी मान्य करत सर्व वंचीत विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात येतील व कुठलाच विद्यार्थी वंचीत राहणार नाही व या बाबत त्वरीत कार्यवाही करत निर्णय घेण्यात येईल असे मत त्यांनी व्यक्त केले.
विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी न लागल्यास व सर्व मागन्या मान्य न झाल्यास अभाविप तर्फे सं.गा.बा.अमरावती विद्यापीठावर तीव्र आंदोलन जरण्यात येईल असा इशारा देखिल अभाविप ने दिला.