विना नंबर प्लेट व वैध कागदपत्रे नसणाऱ्या वाहन चालकां विरुद्ध अकोला पोलिसांची मोहीम

0
584
Google search engine
Google search engine

पहिल्याच दिवशी शहर वाहतूक शाखेची धडक कारवाई

अकोलाः प्रतिनिधी

विना नंबर प्लेट व वैध कागदपत्रे नसणाऱ्या वाहन चालकां विरुद्ध अकोला पोलिसांची मोहीम उघडत पहिल्याच दिवशी शहर वाहतूक शाखेने धडक कारवाई करत ३२ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.

अकोला शहर व जिल्ह्यात दुचाकींचा वापर करून बरेच गुन्हे घडतात, ह्या पैकी काही दुचाकी इतर जिल्ह्यातून चोरून आणून दुसऱ्या जिल्ह्यातील एखाद्या गुन्ह्यात वापर करण्याचे प्रमाण वाढत आहे,तसेच बरेच पालक अल्पवयीन मुलांना त्यांचे कडे वाहन चालविण्याचा परवाना नसतांना सुद्धा दुचाकी/ चारचाकी चालविण्यास देतात ह्या प्रकारावर आळा बसावा म्हणून पोलीस अधीक्षक जी श्रीधर ह्यांनी संपूर्ण जिल्ह्यात आकस्मिक नाकाबंदी करण्यात आली.

सदर नाकाबंदी ही जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनच्या वर्दळीच्या रस्त्यावर लावून त्या मध्ये अधिकारी/कर्मचाऱ्यांची नेमणूक करून वैध कागदपत्रे जवळ न बाळगता किंवा शासनाने मंजुरी दिलेल्या डिजी लॉकर किंवा तत्सम अँप्स मध्ये वाहनांच्या कागदपत्रांच्या प्रति न ठेवणाऱ्या वाहनचालकांची वाहने डेटेंड करून वैध कागदपत्रे दाखविल्या शिवाय वाहन न सोडण्याचे सक्त आदेश दिले.

त्यानुसार अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रीमती मोनिका राऊत ,उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम ह्यांचे मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी आपल्या कर्मचाऱ्या सह धडक मोहीम राबवून वाहनांची तपासणी सुरू केली. आणि पहिल्याच दिवशी वैध कागदपत्रे जवळ न बाळगणाऱ्या किंवा मोबाईल चे अँप्स मध्ये मूळ कागदपत्रांच्या प्रति न ठेवणाऱ्या जवळपास 32 दुचाकी डेटेंड करून वाहतूक कार्यालयात लावल्या, ह्यातील ज्या मोटारसायकल ला नबरप्लेट नव्हत्या अशाही दुचाकी लावून दुचाकी मालकांनी वैध कागदपत्रे सादर केल्या नंतर खात्री करून व तातडीने त्यांना नंबर प्लेट तयार करून समक्ष लावून घेतल्या नंतरच अशी वाहने दंडात्मक कारवाई करून सोडण्यात आली
मोहिमेदरम्यान जे वाहन चालक वैध कागदपत्रे सादर करू शकले नाही त्यांची वाहने डेटेंड करून ठेवण्यात आली
सदरची मोहीम ही जनतेच्या भल्या साठीच असून ह्या निमित्ताने अल्पवयीन मुलांनी वाहने चालवू नये तसेच दुचाकी/चारचाकी वाहन वापरून कोणता गुन्हा घडू नये म्हणून ही मोहीम सुरू करण्यात आली असून नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी केले आहे।