तांत्रिक अडचण सोडण्यासाठी विद्यापीठ मांत्रिक शोधतंय का?”

0
305
Google search engine
Google search engine

“विद्यार्थी प्रतिनिधी अक्षय राऊत यांचा विद्यापीठाला खडा सवाल”
शेगांव :- अमरावती विद्यापीठाने सलग तीन-चार वेळा वेळापत्रकामध्ये बदल केल्याने विद्यार्थ्यांची मानसिक ओढाताण झाल्याचे वास्तव चित्र आपल्याला पाहायला मिळत असतांना पुन्हा विद्यापीठाने विद्यार्थ्यांना छळायला सुरुवात केली.
२० तारखेपासून सुरू झालेल्या विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये online पध्दत वापरण्यात आली त्यामध्ये हजारो विद्यार्थ्यांचे ID login होत नसल्याची बाब समोर आली, सकाळी १० वाजता सुरू होणाऱ्या पेपर ची वेळ संपत आली तरी देखील विद्यार्थी त्यावर login होऊ शकले नाही, काहींचे login झाले परंतु exam start होत नव्हती, काही विद्यार्थ्यांची exam start झाली तर त्यांच्या अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिका न मिळता biochemistry च्या विद्यार्थ्यांना electronics चा पेपर मिळाला. मग प्रश्न असा की विद्यार्थ्यांनी कसा पेपर सोडवावा.
बऱ्याच विद्यार्थ्यांना सलग ७ प्रश्न सारखे आले. काही विद्यार्थ्यांनी ‘सहाव्या सेमिस्टर’ ची परीक्षा देत असताना त्यांना ‘पाचव्या सेमिस्टर’ ची प्रश्नपत्रिका देण्यात आली. काही प्रश्नपत्रिके मध्ये २४० प्रश्न आले आणि सोडवण्यासाठी वेळ फक्त १६ मिनिटे होता अशा परिस्तिथी मध्ये नेमकं विद्यार्थ्यांनी करावं काय? असे एक नाही अनेक प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उभे झाले आहेत.
मग अशा वेळेला उपस्थित झालेल्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी विद्यापीठाने help line नंबर दिला परंतु विद्यार्थ्यांनी कॉल केला असता help line नंबर कडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. आणि जेव्हा मिळाला तेव्हा उडवा उडवीची उत्तरे विद्यापीठाकडून देण्यात आली. पण जेव्हा online परीक्षेचा SGBAU PARIKSHA APP ने असा घोळ उभा केला की तो घोळ थांबवता-थांबवता विद्यापीठाची वाट लागली. आता मात्र काय करावं आणि काय नाही अशात विद्यापीठाने २० ऑक्टोबर ला दुपारी पुन्हा परिपत्रक काढलं, त्यामध्ये अस सांगितले की ज्यांची online होऊ शकली नाही त्यांनी जवळच्या कोणत्याही महाविद्यालयात जाऊन offline परीक्षा द्यावी. (हे पाठवलेलं परिपत्रक म्हणजे चला हवा येउद्या मधील “भाऊ कदम चा विनोद” पण या विनोदाने सर्व विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर मोठा घाव केला.) ज्या विद्यार्थ्यांना परिपत्रक मिळाले ते विद्यार्थी जीवाची पर्वा न करता प्रचंड वेगाने जवळील महाविद्यालयात पोहचले. तिथे सुद्धा विद्यापीठाचे परिपत्रक थोड्याच वेळापूर्वी पोहचले होते त्यामुळे आलेल्या विद्यार्थ्याना परीक्षा देण्यासाठी महाविद्यालयांना तयारी करण्यासाठी सुद्धा वेळ नव्हती. अशामध्ये महाविद्यालयात काहीही करू न शकल्याने विद्यार्थी पुन्हा कचाट्यात सापडले. ५० किमी च्या वर असणाऱ्या विद्यार्थ्यांना येणे शक्य नव्हते. काहींना पत्रकच दुसऱ्या दिवशी मिळाले.
यामुळे २० ऑक्टोबर ला परीक्षा देणारे विद्यार्थी परीक्षे पासून वंचित राहिले.
या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाने पुन्हा २० ऑक्टोबर च्या रात्री परिपत्रक जाहीर केले की २०/२१ तारखीची परीक्षा ही ८ नोव्हेंबर ला होईल. आणि २२ पासूनच्या परीक्षा जश्याच्या तशा होतील.
आता सगळे विद्यार्थी २२ तारखेला होणाऱ्या परीक्षेची तयारी करीत होते.
परंतु २१ तारखेला पुन्हा अस परिपत्रक आलं की २२ पासून होणाऱ्या सर्व परीक्षांना स्थगिती देण्यात येत आहे. पुन्हा परीक्षा कधी घेणार ह्या माहीतीचे परिपत्रक लवकरच जाहीर केल्या जाईल असे सांगितल्या गेले.
प्रचंड तांत्रिक अडचणीत अडकलेले विद्यार्थी अजूनही सुटलेच नाही.
“SGBAU pariksha aap” अधिकाधील समस्या निर्माण करून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळत असल्याचे पाहायला मिळत आहे.
“तांत्रिक” अडचणीसाठी आता विद्यापीठ का “मांत्रिकाचा” शोध घेत आहे का?” असा प्रश्न निर्माण होत आहे.
विद्यापीठाने लवकरात लवकर यावर तोडगा काढावा. अन्यथा आम्हा विद्यार्थ्यांना आक्रमक व्हावे लागेल. असे मत विद्यार्थी प्रतिनिधी अक्षय भाऊराव राऊत यांनी व्यक्त केले.