मोर्शी येथे आमदार देवेंद्र भुयार यांनी घेतला अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच आढावा ! 

0
1253
Google search engine
Google search engine
मोर्शी येथे आमदार देवेंद्र भुयार यांनी घेतला अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच आढावा !
आमदार देवेंद्र भुयार यांच्या हस्ते राष्ट्रीय कुटुंब साहाय्य योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेश वाटप !
कृषी विभागाचे अधिकारी कृषी सहाय्यक तलाठी यांना मुख्यालयी राहण्याचे दिले आदेश !
मोर्शी तालुका प्रतिनिधी:
आमदार देवेंद्र भुयार यांच्या उपस्थितीत मोर्शी तहसील कार्यालयात येथे जून ते ऑगस्ट या कालावधीमध्ये मोर्शी तालुक्यातील झालेल्या अतिवृष्टी, पुरामुळे शेत जमीन खरडून जाणे त्यामुळे शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानि संदर्भात  कृषी विभागासह सर्व शासकीय योजनांचा आढावा माहिती जाणून घेतली त्यामध्ये मोर्शी तालुक्यातील जिरायत पिकाखालील १८३५० शेतकऱ्यांचे  सोयाबीन पिकाचे १७८६२.८६हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून कापूस कापूस पिकाचे १२.९९ हेक्टर क्षेत्र , मुंग पिकाचे २३ हेक्टर क्षेत्र ,  उडीद पिकाचे ५२ हेक्टर क्षेत्र, मका पिकाचे १४.८० हेक्टर क्षेत्र, असे ऐकून १७९६५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची तात्काळ मदत मिळवून देण्यासाठी शासनाकडे तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश आमदार देवेंद्र भुयार यांनी अधिकाऱ्यांना दिले. मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना तलाठी, कृषी सहाय्यक वेळेवर हजर मिळत न सल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यामुळे शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून कृषी विभागाचे अधिकारी कृषी सहाय्यक व सर्व तलाठी यांनी मुख्यालयी राहण्याचे देण्यात निर्देश देण्यात आले.
      यावेळी राष्ट्रीय कुटुंब अर्थ सहाय्य योजनेतील लाभार्थी भावना बनसोड, वंदना तिखिले, बेबी खुरसडे, राजकन्या टिंगणे, रमेश गोबाडे, सिंधू मनोहर या सर्व लाभार्थ्यांना  प्रत्येकी २० हजार रुपयांचे धनादेश आमदार देवेंद्र भुयार यांच्या हस्ते वाटप करण्यात आले .
जून ते ऑगष्ट  या कालावधीत अतीवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या तालुक्यातील  गावांतील पीक नुकसानीचा आढावा तसेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना(पोकरा), कृषी योजना, औजार यंत्र योजना यासह विविध योजनांना आढावा यावेळी घेण्यात आला.
यावेळी आमदार देवेंद्र भुयार, उपविभागीय अधिकारी  नितीन हिंगोले, उपविभागीय  कृषी अधिकारी राहुल सातपुते, तहसीलदार डॉ सिद्धार्थ मोरे, नगराध्यक्ष मेघनाताई मडघे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालूकाध्यक्ष नरेंद्रभाऊ जिचकार, स्वाभिमानी शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष हितेश साबळे, जी प सदस्य संजय घुलक्षे, माजी जी प सदस्य बंडूभाऊ साऊत, मोहन मडघे, नगरसेवक नईम खान यासह विविध विभागाचे अधिकारी व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.