स्वाभिमानी विद्युत वकर्सचा अनोखा स्त्रीशक्ती जागर

0
719

आकोटःसंतोष विणके

गरजु असहाय कन्येची घेतली शैक्षणिक जबाबदारी

महावितरण अकोट उपविभागातर्गत असणारी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी विद्युत वर्कस युनियन अकोटने स्व.कॉ. शरदचंद्रजी खोले यांचे स्मृती प्रित्यर्थ अकोट शहरातील अनाथ गरजु मुलगी कु. रितु ज्ञानेश्वर अवंडकर या होतकरु व हुशार मुलीला तिच्या शौक्षणिक खर्चाची जबाबदारी घेत दत्तक घेतले. कु.रितु हिची शहरातील नरसिंग कन्या ज्यु.कॉलेज मध्ये 11वी कॉर्मस वाणिज्य शाखेत ऍडमिशन करुन दिली.

निमित्ताने स्वाभिमानी विघुत वर्कस युनियन च्या पदाधिकाऱ्यानी नरसिंग ज्यु.कॉलेज चे प्राचार्य दीपक देव व कु.रीतु यांचे संत नरसिंग महाराज यांची प्रतिमा ,पुष्पगुच्छ देऊ स्वागत व आभार व्यक्त केले.स्व. कॉ. शरदचंद्रजी खोले यांची ख्याती गरीब व होतकरु विदयार्थीना होईल तशी मदत करण्याची होती. व तोच पायंडा त्यांचे स्वाभिमानी विद्युत वर्कस युनियन मधील पदाधिकारी सुद्धा पाळत आहेत

यावेळी युनियन चे कॉ.विलास भारती झोनल सचिव,कॉ.अशोक टोलमारे जेष्ठ मार्गदर्शक ,कॉ. रजाअली विभागीय अध्यक्ष, कॉ. संजय डफडे ,कॉ. एम.आर. खान ,कॉ गोपाल नेरकर ,कॉ. प्रशांत मोहोकार ,कॉ. सचिन चिचोळकर,कॉ. किरण पवार विभागीय सचिव ,कॉ.योगेश वाकोडे शाखा सचिव ,कॉ.गोपाल केदार तसेच महाविदयालयाचे शिक्षक राजेश जोशी ,शिवशंकर पिंजरकर ,सुधीर काटेकर ,मुकूल देशपांडे आदि उपस्थितीत होते.