येरला येथून श्रावणबाळ योजना आपल्या दारी उपक्रमाला सुरुवात ! नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांचा अभिनव उपक्रम !

0
910
येरला येथून श्रावणबाळ योजना आपल्या दारी उपक्रमाला सुरुवात !
नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांचा अभिनव उपक्रम !
संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निवृत्‍ती वेतन योजना, यासह विविध शासकीय योजना जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम सुरू !
मोर्शी तालुका प्रतिनिधी :
         मोर्शी तालुक्यातील विविध सवलतींच्या योजनांसाठी नागरिकांना होणारा त्रास व शासकीय सरकारी कार्यालयात नागरिकांना हेलपाटे मारावे लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर सर्व कामे एकाच ठिकाणी तात्काळ होण्यासाठी या उपक्रमाची सुरुवात येरला येथून करण्यात आली असून या उपक्रमाचे आयोजन मतदार संघातील प्रत्येक गावात करण्यात येनार आहे.
विविध शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना थेट त्यांच्या दारापर्यंत पोहोचविण्याच्या हेतूने ‘आमदार देवेंद्र भुयार यांनी हा उपक्रम मतदार संघातील प्रत्येक गावात राबविण्यास सुरुवात केली आहे. मतदार संघातील नागरिकांना योजनांचा लाभ मिळावा यासाठी आमदार आमदार देवेंद्र भुयार यांनी हा उपक्रम सुरू केला.
 यावेळी नागरिकांना नवीन , संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निवृत्‍ती वेतन योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना,  अशा विविध शासकीय योजनांच्या पात्रतेचे निकष सांगण्यात येत आहे . तसेच पात्र गरजु नागरिकांचे अर्ज कार्यक्रम स्थळी स्वीकारण्यात येवून त्यांची विविध योजनांसाठी निकषाप्रमाणे निवड करण्यात येत आहे . कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे गजानन वानखडे सौरभ रोकडे अमोल भूतकर शुभम तिडके अनिल ठाकरे रोशन पवार पंकज बेले गजानन राऊत इकबाल शेख, अनुराग घाटे, अंकुश कोंघे, मारोती बगल यांच्यासह आदींनी परिश्रम घेतले.
     आतापर्यंत कोणत्याही शासकीय कामाकरिता शासनाच्या दारी जावे लागत होतं. पण आमदार देवेंद्र भुयार यांच्या प्रयत्नाने शासन नागरिकांच्या दारावर येऊन सेवा देण्याचे कार्य सुरू झाले आहे. आमदार देवेंद्र भुयार यांच्या अभिनवी उपक्रमाला येरला येथून सुरुवात झालेली आहे. मोर्शी तालुक्यातील पंचायत समिती क्षेत्रनिहाय सर्व प्रशासकीय यंत्रणा गावागावात जाऊन सेवा पुरवण्याचे कार्य सुरू झाले आहे .
     विविध विभागांमार्फत पुरवले जाणारे प्रमाणपत्र  गावकऱ्यांना वितरण करण्यात येणार आहे . ही तर परिवर्तनाची सुरुवात आहे, यापुढे आमदार देवेंद्र भुयार  हे लोकसेवेचे कार्य गावात जाऊन करणार असून नागरिकांना कुठलाही त्रास न होता त्यांचे आवश्यक ते कागदपत्र घरपोच मिळणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष हितेश साबळे यांनी सांगितले._