अमरावती जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची तातडीने भरपाई मिळावी – अँड यशोमती ठाकूर यांनी केली मुख्यमंत्र्यांकडे मागणी.*

0
1006
Google search engine
Google search engine

जिल्हयातील प्रलंबित विषयांबाबत घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट*

*नुकसान भरपाई लवकरच देण्यात येईल मुख्यमंत्र्यांचे आश्वासन*

मुंबई दि 27 आँक्टोबर – अमरावती जिल्हयात जुलै ते सप्टेंबर या कालावधीत मोठया प्रमाणात अतिवृष्टी झाली असून त्या अतिवृष्टीची नुकसान भरपाई तातडीने मिळावी यासह जिल्ह्यातील प्रलंबित विषयांबाबत आज महिला व बाल विकास मंत्री तथा अमरावतीच्या पालकमंत्री अँड. यशोमती ठाकूर यांनी आज मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी आमदार बळवंत वानखेडे, माजी आमदार विरेंद्र जगताप, जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख उपस्थित होते. अतिवृष्टीची नुकसान भरपाई देणेबाबत शासन संवेदनशील असून लवकरच भरपाई देण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी आश्वासित केले.

 

अमरावती जिल्हयात जुलै ते सप्टेंबर या कालावधीत मोठया प्रमाणात अतिवृष्टी झाली असून त्या अतिवृष्टीची नुकसान भरपाई तातडीने मिळावी, अशी मागणी पालकमंत्र्यांनी केली.
त्याचप्रमाणे, सन २०२०-२०२१ मध्ये जिल्हा वार्षिक आराखड्यामधील प्रस्तावित नवीन कामे सुरु करण्यासाठी शासनस्तरावर नव्याने आदेश करणे आवश्यक आहे, सन 2018-19 मधील फळ पिकांचे नुकसान भरपाईचे 102 कोटी अद्यापपर्यंत प्राप्त झालेले नाही. सदर प्रलंबित नुकसान भरपाईचे पैसे मिळावे, मार्च 2020 विधीमंडळ अधिवेशनात अमरावती जिल्ह्यासाठी नवीन प्रशासकीय इमारती मंजुर झाल्या आहेत, त्या इमारतीचे प्रशासकीय आदेश व निधी उपलब्ध करुन देण्यात यावेत, मेळघाटमधील पुनर्वसित गावांकरिता शासनाच्या धोरणातील पर्याय एक नुसार प्रत्येक व्यक्तीमागे 10 लाख रु. देण्यात येत आहे परंतु ज्या गावात पुनर्वसन करण्यात येते त्या ठिकाणी मुलभूत सुविधेसाठी कुठलेही अनुदान देण्यात येत नाही. वेळेवर सुविधा उपलब्ध होत नाही. त्यामुळे मेळघाटमधील पुनर्वसित झालेले कुटुंब परत मुळगावी (मेळघाटात) येतात. याकरिता पुनर्वसनसाठी मुलभूत सुविधा व इतर आवश्यक सुविधा करणे आवश्यक आहेत. जेणेकरुन पुनर्वसित कुटुंब परत येणार नाही, नगरपालिका प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत तसेत सामाजिक न्याय विभागामार्फत रमाई घरकुल आवास योजनेतील घरकुल पुर्ण झाल्यानंतरही त्यांचे अनुदान मिळालेले नाही. अनुदान उपलब्ध करण्याबाबत मागणी करण्यात आली. अमरावती जिल्हयातील वाळू लिलाव बंद असून अद्याप पर्यंत वाळू लिलाव न झाल्यामुळे नागपूर येथील कन्हान नदीतून वाळू आणावी लागते. त्यामुळे बांधकाम करण्यास अडचणी निर्माण होत आहे. त्यामुळे शासनाची बांधकामे व घरकुलाची बांधकामे कामे पुर्ण होत नाही. अमरावती जिल्ह्यातील वाळू घाट लिलाव करणेबाबत मार्गदर्शक सुचना देण्यात याव्यात, अमरावती जिल्हयातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर आदेश काढण्याबाबत विनंती करण्यात आली.
अमरावती शहरातील ग्रामिण भागातील जुने बांधकाम असतील त्या ठीकाणी पोलीस क्वार्टर्स चे नवीन बांधकामे होण्याबाबत विनंती करण्यात आली.
०००