जरूड येथील विकासकामांचे आमदार देवेंद्द भुयार यांच्या हस्ते भूमिपूजन – जरूड येथील रस्ता बांधकामाकरीता अंदाजे २२ लक्ष ५० हजार रु निधी मंजूर !

0
791
Google search engine
Google search engine

 

वरुड तालुका प्रतिनिधी :
जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र बहुरूपी यांनी जिल्हा परिषद मतदारसंघातील जरुड येथे विकास कामाकरीता निधी उपलब्ध करून कामांचे भूमिपूजन आमदार देवेंद्र भुयार यांचे हस्ते करण्यात आले. जिल्हा परिषद सदस्य राजेन्द्र बहुरुपी यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा परिषद अमरावती अंतर्गत नागरी सुविधा योजनेतून जरुड ग्राम पंचायतीला नागरी सुविधा करीता स न. १९-२० ला प्राप्त झालेल्या निधीतून मेन रोड ते दादाजी दरबार येथील रस्ता बांधकामाकरीता अंदाजे २२ लक्ष ५० हजार रु निधी मंजूर झाला, भूमिपूजन कार्यक्रम आमदार देवेंद्र भुयार यांच्या हस्ते संपन्न झाला त्यावेळी जी. प. सदस्य राजेंद्र बहुरूपी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रमोद उर्फ बाळू कोहळे पाटील, माजी जी.प.सदस्य सुरेश नागले, माजी सभापती राजाभाऊ कुकडे, युवा तालुकाध्यक्ष रोशन दारोकर, सरपंच सुधाकर मानकर, उपसरपंच शैलेश ठाकरे,माजी सरपंच भावनाताई सातपुते, माजी सरपंच मधुकर राव देशमुख, महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सोपानभाऊ ढोले, ग्रामपंचायत सदस्य उज्ज्वला पोकळे, उमेशभाऊ सर्याम , संजयभाऊ ढाले, गणेश देशमुख, ज्ञानेश्वरराव यावले, कृष्णराव सोनारे, महेंद्र हरले, आशिष आंडे, advo. संध्या ढोक, विनोद गवळी,सुभाष बेलसरे, सुभाष बनसरे, पंजाबराव हरले, पुरुषोत्तम वागदरे ,अनिल बिले, रवींद्र बिजवे,भानुदास अलोणे, प्रकाश ब्राम्हणे, आशिष हरले, हर्षद मोरे, तेजस खारकर, सुभाष कांबळे, अनिल टोम्पे, सुनील ठाकरे, उमेश चरपे,जितू जैन,निलेश वानखडे, रमेश हरले, उमेश बाहे यांच्यासह आदी प्रामुख्यानेे उपस्थित होते.