पोलीस प्रशासनाची चोरी गेलेल्या मुळ दुचाकी मालकांना दीवाळी पुर्वीच अनोखी भेट

393

शहर वाहतूक शाखेच्या तपासात बेवारस मोटरसायकली निघाल्या चोरीच्या….मूळ मालकांचा शोध घेऊन दिल्या परत

अकोलाःप्रतिनिधी

अकोला शहर वाहतूक शाखा विविध मोहिमा राबवून संशयास्पद मोटारसायकली जप्त करते, सदर मोटारसायकली तश्याच पडलेल्या राहतात, परंतु जिल्हा पोलिस अधीक्षक जी श्रीधर ह्यांनी बेवारस मुद्देमाल प्रकरणात मूळ मालकाचा शोध घेऊन योग्य ती कायदेशीर कार्यवाही करून सदर मुद्देमाल परत करण्याचे आदेश दिलेले असल्याने शहर वाहतूक पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी त्यांचे कडे दीर्घ काळा पासून बेवारस असलेल्या 5 मोटारसायकली च्या मूळ मालकांचा शोध घेतला असता मोटारसायकल क्र MH27 S 6908 ही CD डॉन मोटार सायकल ही अभिनय रमेश भिले रा भोपापुर ता अचलपूर जिल्हा अमरावती। 2) मोटारसायकल क्र MH 27 AQ 1093 ही स्प्लेनडार मोटारसायकल हरीश काशीनाथ घाटे रा सिद्धांतपुर वादुरा ता नांदगाव खंडेश्वर, जिल्हा अमरावती 3) MH30 Y 9827 ही ट्विस्टर मोटारसायकल डॉक्टर गिरीश अशोकराव भटकर रा तापडिया नगर, गड्डाम प्लॉट अकोला 4) MH 27 R 2891 ही स्प्लेनडार मोटारसायकल रवी हिरालाल कुशवल रा चेतनदास हेल्थ सेंटर अमरावती 5) विना नंबर ची पॅशन प्लस ही मोटारसायकल चेसिस व इंजिन क्र वरून बाळकृष्ण जगन्नाथ भोसले रा विजयनगर, वडगाव पुणे ह्यांची असल्याचे निष्पन्न करून सदर मूळ मालकांशी संपर्क करून त्यांना मोटारसायकल बाबत माहिती दिली .ञ

असता त्यांना आनंदाचा धक्का बसला, 2 ते 3 वर्षांपूर्वी चोरी गेलेली मोटारसायकल परत मिळेल ह्याची आशा सोडून दिल्या नंतर अचानक पोलिसांकडून मोटारसायकल घेऊन जा असा निरोप आल्याने त्यांचा प्रथम विश्वासच बसला नाही, 5 मोटारसायकली पैकी ज्यांनी पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला नव्हता अश्या 2 मूळ मालकांना त्यांचे कडून प्रतिज्ञापत्र घेऊन व वाहनांचे कागफपत्रे पडताळून मोटारसायकली त्यांचे सुपूर्द करण्यात आल्या त्या पैकी एक व्यक्ती एवढी गरीब होती की त्याच्या प्रतिज्ञापत्राचा खर्च सुद्धा वाहतूक पोलिसांनी केला।