रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या निवासस्थानाहून मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतल

450

रिपब्लिक चे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या निवासस्थानाहून मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतल आहे. त्याच्यावर मुंबई पोलिसांनी शारीरिक अत्याचार केल्याचे अर्णब गोस्वामी यांचे म्हणणे आहे. मुंबईत पोलीस चौकशीसाठी आज त्याच्या घरी पोहोचले असता, त्याने पोलिसांची दीड तास हुज्जत घातली. त्यामुळे पनवेल पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. अर्णव गोस्वामीला केव्हाही अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पोलिसांनी आपल्याला धक्काबुक्की केली असं अर्णब गोस्वामींने म्हटल्याचं एएनआयने सांगितलं आहे. अर्णब गोस्वामींना ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाला त्यावेळी पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

जाहिरात