बोंडसडी प्रश्नी युवक काँग्रेसचे शेतकऱ्यांसह निवेदन….बोंडसडीच्या संकटाने शेतकरी हवालदिल

231

अकोट:संतोष विणके

सोयाबीन नंतर आता कपाशी पीक धोक्यात  आल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.गेल्या चार वर्षांपासून कपाशीवर बोंडसडी रोगामुळं मोठ्या प्रमाणात कपाशीचे नुकसान करत आहे.

आतापर्यंत यावर कृषी शास्त्रज्ञांनी कोणतीही औषध सांगितली नाही. पण आमचे बोंड अळी ने नुकसान न होता बोंड सड या रोगाने नुकसान होत आहे.आम्ही यापूर्वी सतत मा.श्री अमृतराव देशमुख यांच्या मार्गदर्शनात पीकेव्ही अकोला व जिल्हाधिकारी साहेबांना यवतमाळ ,अमरावती ,वर्धा या जिल्ह्यात साहेबांच्या समक्ष या बोंडसड या रोगावरील चर्चासत्र घडवून आणावे असे निवेदन सादर करून सुद्धा आतापर्यंत असे काही झाले नाही.


त्यामुळं उपाययोजना न सुचविल्यामुळे शेतकरी अधिक कर्जबाजारी होऊन काही शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढण्याची भिती आहे. दरवर्षी आम्ही आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निवेदन सादर करीत होतो परंतु विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांकडून औषध बद्दल मार्गदर्शन न देता आम्हाला इतर मार्गाने विण्याचा सतत प्रयत्न होत आहे. म्हणून आमच्या निवेदनावर सहानुभूतीपूर्वक विचार करून या वर्षी आम्हाला सक्षम बोडसड या रोगावर संशोधन व्हायला पाहिजे हे प्रमाण वाढले आहे त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे त्यांच्या मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे शास्त्रज्ञांनी त्यावर संशोधन करण्याची आवश्यकता असल्याचे मत शेतकऱ्यांनी मांडले आहे यावर तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी यानिमित्त करण्यात आली.

यावेळी युवक काँग्रेस जिल्हा महासचिव मयुर किशोर निमकर, वैभव इंगळे,वसंतराव बेलसरे, सागर हाडोळे, विलास घाटोळ, विकास पिंपळे, वसंतराव काळे,सचिन निमकर, अक्षय हाडोळे, आदित्य सोनटक्के, भूषण गंणगणे,सुमित खलोकर, जयहिंद लोखंडे,अतुल निमकर, मधुसूदन उपासे, शिरीष घाटोळ, किशोर लहाने, अनिल लोणकर, शुभम घुंगट, श्रीधर चिखले, भूषण पुसे, विकी दिंडोकार, कैलास डांगरे, विजय नाथे,प्रणय शेगोकार, राजू चिखले रोशन काळे, सौरभ दिंडोकार, ज्ञानेश्वर काळे, तथा युवक काँग्रेसचे पदाधिकारी प्रवीण बोडखे, प्रतिक गोरे, विशाल राठोड, नंदू टेमझरे आधी शेतकरी उपस्थित होते