महामार्गावरील विना हेल्मेटधारी दुचाकी धारकांना दंड…तर हेल्मेटधारींचा गुलाबपुष्पाने सत्कार

220

शहर वाहतूक शाखेची अनोखी मोहीम

आकोलाः प्रतिनिधी

जिल्हा पोलिस अधीक्षक जी श्रीधर ह्यांनी पूर्वीच घोषित केल्या प्रमाणे आज पासून अकोला शहर वगळता जिल्ह्यात विशेष करून राष्ट्रीय व राज्य महामार्गावर आज पासून विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या वर शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके, पोलीस उपनिरीक्षक सुरेश वाघ ह्यांचे नेतृत्वात दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली,आज सकाळ पासूनच शहर वाहतूक शाखेचे कर्मचाऱ्यांनी शहराच्या जवळील महामार्गावर विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या चालकांवर दंडात्मक कारवाई सुरू केली

, कारवाई करतांना काही दुचाकी चालक हेल्मेट घातलेले सुद्धा आढळून आले त्यांचा जागरूक नागरिक म्हणून गुलाबपुष्प देऊन पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी सत्कार केला, त्यातील बरेच चालक जेव्हा पासून दुचाकी खरेदी केली तेव्हा पासूनच सतत हेल्मेट चा वापर करीत असल्याची माहिती त्यांनी दिली

, त्यांचे जागरूकते बद्दल पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी त्यांचे आभार व्यक्त करून त्यांचा गुलाबपुष्पाने सत्कार केला, ही मोहीम महामार्गावर सुरूच राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले।

जाहिरात