कोदोरी ते काजळी रोड कडे अधिकारी यांच्या बरोबर लोकप्रतिनिधी चे दुर्लक्ष

169

कोदोरी ते काजळी रोड कडे अधिकारी यांच्या बरोबर लोकप्रतिनिधी चे दुर्लक्ष
निधी उपलब्ध करून देण्यासाठी युवक काँग्रेसचे पत्र

चांदुर बाजार//

तालुक्यातील निभोरा ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या कोदोरी या गावाला जोडणारे काजळी ते कोदोरी फाटा रोडची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून काही वर्षे पासून या रोडकडे जिल्हा परिषद सदस्य यांच्या बरोबर स्थानिक लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष झाले आहे.तर या रोडवरून काजळी,देऊरवाडा या भागातील लोकांची शेती असून मोठी कसरत आणि जीव मुठीत घेऊन शेतमाल याची वाहतूक या ठिकाणी वरून शेतकरी याना करावी लागते.मात्र शेतकरी यांच्या बरोबर या ठिकाणी कोंदोरी ग्राम येथे आरोग्य चा प्रश्न उपस्थित झाला तर मोठी गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.

याबाबत अचलपूर येथिल कनिष्ठ अभियंता जिल्हा परिषद बांधकम विभाग विभाग सोबत संपर्क साधून माहिती घेतली असता रोड च्या कामासाठी निधी उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. मात्र शेती साठी दुसऱ्या पर्ययी मार्ग उपलब्ध नसल्याने शेतकरी याना या रोडवरून वाहतूक ची मोठी समस्या निर्माण झाली आहे. तर रात्री बे रात्री शेतात जावे लागत असल्याने या रोडवरील खड्डे हे अधिकच जीवघेणे झाले आहे.

तर याबाबत शेतकरी यांची आणि कोदोरी येथील नागरिक यांची समस्या लक्षात घेत अचलपूर मतदार संघ युवक काँग्रेसचे अध्यक्ष विकास सोनार यांनी या रोडच्या बांधकाम साठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख यांना पत्र दिले असून लवकरच या रोडला निधी उपलब्ध होऊन शेतकरी यांच्या समस्या सुटतील अशी माहिती सोनार यांना प्रतिनिधी शी बोलताना दिली आहे.

प्रतिक्रिया शेतकरी यांची
कोदोरी रोडवरून रोज शेतात जाणे येणे करावे लागते.या रोडची अंत्यत दयनीय अवस्था झाली असून या कडे जिल्हा परिषद विभाग ने लक्ष देऊन दुरुस्ती करावी.पडलेल्या जीवघेण्या खड्यामुळे कंबर दुखीचा तसेच अपघात ची शक्यता आहे.

1)मनोज देशमुख काजळी शेतकरी

या रोडवरून जीव मुठीत शेतीमालाची वाहतूक करावी लागते.मात्र राजकीय पुढारी यांनी याकडे सक्षम पणे दुर्लक्ष केले असल्याचे दिसून येते.आता शेतीची कामे अधिक वाढल्याने रोडची दुरुस्ती करण्यात यावी.


2)अरविंद कपले शेतकरी

जाहिरात