राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या चरण पादुकांचे आकोटात पूजन

0
1040

अकोटःसंतोष विणके

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवानिमित्य दरवर्षीप्रमाणे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराराजांच्या चरण पादुका पालखीचे दि. 3 नोव्हेंबर मंगळवार रोजी आकोट आगमन झाले.यंदा कोरोनामुळे पायदळ दिंडी सोहळा रद्द करण्यात येऊन महाराजांच्या मूळ चरण पादुकांचे पूजन करून वंदन करण्यात आले.यानिमित्त्याने कोरोना संकटातही राष्ट्रसंतांच्या चरण पादुकांच्या पूजनाची परंपरा अखंडित राहिली. स.११ वा चरण पादुका पालखीचे गुरुदेव सेवाश्रम पाटसुल रेल्वे येथुन अकोला मार्गावरील स्थानिक अशोक मुंडगावकर यांच्या वाडीत आगमन झाले.यावेळी पादुका पालखीचे गुरु भक्तांनी पूजन वंदन करून महाराजांना सुमनांजली अर्पण केली. कोरोना आपत्तीमुळे यावर्षी पालखीचे व यात्रेकरूंचे स्वागत,दर्शन,पूजन गोपालकाला,भजन व ईतर कार्यक्रम मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी उपस्थित भाविकांनी नियम व अटींचे पालन वंदनिय महाराजांच्या चरण पादुकांचे दर्शन घेतले. याप्रसंगी डॉ. उद्धवराव गाडेकर महाराज, अशोकदादा मुंडगावकर, सुरेश अग्रवाल, प्रमोद मुंडगावकर,देवेंद्र ढोले, सचिन मुंडगावकर ऋषिपाल अनासने,कैलास पिंजरकर आदींसह ईतर मोजक्या गुरुदेव भक्तांची उपस्थिती होती.