न्यूज पोर्टल , डिजिटल माध्यमांवर आता माहिती प्रसारण खात्याचं नियंत्रण

411

नवी दिल्ली – देशभरातील डिजीटल माध्यमे तसेच ओटीटी मंच हे माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीत येणार आहेत. आज सकाळी याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.बुधवारी या संदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

 

देशातील डिजिटल माध्यमांवर आता केंद्र सरकारच्या माहिती प्रसारण खात्याचं नियंत्रण असेल. सध्या डिजिटल म्हणजेच ऑनलाइन माध्यमांवर कोणाचंही नियंत्रण नव्हतं. केंद्र सरकारनं जारी केलेल्या अधिसूचनेमुळे आता डिजिटल म्हणजेच ऑनलाइन माध्यमं, ऑनलाइन चित्रपट, ऑडिओ विझुअल कन्टेन्ट, बातम्या आणि ताज्या घडामोडींविषयीचा कन्टेन्ट माहिती प्रसारण खात्याच्या अंतर्गत दिला गेला आहे. बुधवारी ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

जाहिरात