_अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२०_*निवडणूक निरीक्षक आनंद लिमये अमरावतीत दाखल*

0
702

 

अमरावती, दि. ११ : शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षक आनंद लिमये हे अमरावती येथे दाखल झाले आहेत.

श्री. लिमये हे १९८९ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असून, ते यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) येथे महासंचालक पदावर कार्यरत आहेत.
अमरावती येथे त्यांचे वास्तव्य व कार्यालय शासकीय विश्रामगृहात पूर्णा कक्ष येथे आहे. संपर्क दूरध्वनी क्रमांक (०७२१) २६६ १६ १६ असा आहे.

त्यांचे संपर्क अधिकारी म्हणून समाजकल्याण विभागाचे अधिकारी सुनील वारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

०००