न.पा. वाचनालयात दिवाळी अंकाचे  पूजन

352

आकोटः प्रतिनिधी

अकोट नगर परिषद सार्वजनिक वाचनालयात वाचकांकरिता दर्जेदार दिवाळी अंक उपलब्ध करण्यात आले असून यादिवाळी अंकाचे मान्यवरांचे हस्ते पूजन करण्यात येऊन ते वाचकांकरिता खुले करण्यात आले.

यावेळी नगराध्यक्ष हरीनारायण माकोडे, शिक्षण सभापती खालीद जमा मो.आदिल, गटनेते गजानन लोणकर, नगरसेवक मंगेश लोणकर, विवेक बोचे,प्रशासन अधिकारी प्रदीप रावणकर, ज्येष्ठ वाचक प्रा.अशोक तायडे प्रा. शरद झामरे, संदीप देशमुख,सचिन शेंडे, रामेश्वर काठोके यांची उपस्थिती होती.


याप्रसंगी ग्रंथालयाच्या स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेच्या नवीन इमारतीस मान्यवरांनी भेट देऊन कामाचा आढावा घेतला. ग्रंथपुजना करता ग्रंथपाल संजय बेलुरकर ग्रंथालय सेवक नितीन हाडोळे यांनी परिश्रम घेतले.

जाहिरात