कोंडच्या लाईनमनने शाखा अभियंत्याच्या परस्पर पोलवरच्या तारा उतरल्या !

0
630

कोंडच्या लाईनमनने शाखा अभियंत्याच्या परस्पर पोलवरच्या तारा उतरल्या !

उस्मानाबाद / प्रतिनीधी


उस्मानाबाद तालुक्यातील कोंड येथील नारायण

पाटिल यांच्या शेताजवळून जाणार्या जागजी आंदोरा रसत्यावरील पोलवरील तारा लाईनमनने उतरल्यामुळे त्या रोडवर रात्री ये जा करणे धोक्याचे झाले आहे.
याबाबत अधीक माहिती अशी की विजय भुमकर यांच्या घरापासून मुलाणी डिपी पर्यंत असलेल्या पोलवरील सर्वच तारा लाईनमनने परस्पर शाखा अभियंत्याला न विचारताच मनाने अति शहाणपणा करुन तारा उतरवल्या आहेत. याबाबत तत्कालीन शाखा अभियंता कांबळे यांना संपर्क केला असता त्यांनी हा विषय त्यांना माहितच नसल्याचे सांगीतले तसेच माझ्या परस्पर लाईनमनने या तारा उतरवल्या आहेत मी त्या लाईनमनला कसलाही लेखी किंवा तोंडी आदेश दिलेला नाही. आणि त्याबाबत माझ्याकडेही कार्यालयाचा कोणताही आदेश नाही असे सांगीतले. मघ शाखा अभियंत्याचे पद हे डमीच आहे कि काय अशी चर्चा रंगली आहे.सदर तारा उतरण्याच्या अधीकार कोण दिला असा सवाल उपस्थीत होत आहे.
नेमक्या कोणत्या अधीकार्याच्या आदेशाने या तारा उतरवल्या आहेत याबाबत लेखी तक्रार करण्यात येणार आहे.व सदर प्रकाराची चौकशी करुन तात्काळ संबंधीत दोषीवर कार्यवाही करावी अशी मागणीही करण्यात येणार आहे. या लाईनमनने नेमक कोणाच्या सांगण्यावरुन तारा उतरल्या आहेत याची चौकशी करण्याची मागणी होत आहे. एखाद्या ठिकाणावरील पोलवरच्या चालू असलेल्या तारा व त्या पोलवर ग्रामपंचायतचीही स्टेट लाईल उतरवली आहे. त्यामुळे या अति शहाण्या लाईनमनने हा शहाणणाच केला असेच म्हणावे लागेल.सदर प्रकारावर वरीष्ठांनी जर लक्ष नाही घातले तर प्रकरण चिघळण्याची शक्यता आहे. ( भाग १ ) आणखीन याच लाईनमचे कारनामे उद्याच्या (भाग २ मध्ये)