भिऊ नका, स्वामी समर्थ पाठीशी, तर पदवीधर तुमच्या सोबतीला आहेत : खासदार डॉ. जयसिद्धेशवर शिवाचार्य महास्वामी..!!*

0
493
Google search engine
Google search engine

सांगली/कडेगांव

अक्कलकोट, जिल्हा-सोलापूर येथे *भारतीय जनता पक्षाचे पुणे विभाग पदवीधर अधिकृत उमेदवार मा. संग्रामसिंह संपतराव देशमुख* तसेच *पुणे विभाग शिक्षक उमेदवार मा. जितेंद्र पवार, यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याचे माजी सहकारमंत्री मा. सुभाष बापू देशमुख, यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सोलापूर लोकसभा खासदार मा. डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामीजी,मा. आमदार सचिन कल्याणशेट्टी, महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री मा. लक्ष्मणराव ढोबळे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हा स्वामी समर्थांचा तर भिऊ नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत हा पदवीधरांचा आशिर्वाद पुणे पदवीधर मतदार संघाचे उमेदवार संग्रामसिंह संपतराव देशमुख यांना असल्याचे प्रतिपादन सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेशवर शिवाचार्य महास्वामी यांनी केले. अक्कलकोट ( जि. सोलापूर) येथे आयोजित पदवीधर मेळाव्यात ते बोलत होते.

माजी सहकार मंत्री आ.सुभाष देशमुख म्हणाले, प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपणच उमेदवार असल्याचे समजून कामाला लागावे, पक्षाने चारित्र्य संपन्न आणि तरुणांसाठी युवा उमेदवार दिला आहे. त्यामुळे आपलं काम अधिक सोपं झालं आहे.

माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे म्हणाले, विधान भवनाच्या पायऱ्या झप झप चढून जाणारा, आपल्या प्रत्येक प्रश्नांवर दिल्लीत धडक मारू शकणारा, तरुण तडफदार उमेदवार पदवीधरांना निवडून द्यायला हवा. समर्थांच्या पायाचा स्पर्श झाला की ती व्यक्ती मंत्री होते. यापूर्वी प्रकाश जावडेकर, चंद्रकांतदादा पाटील यांनी अनुभव घेतला आहे.

आमदार सचिन कल्याणशेट्टी म्हणाले, संग्रामसिंह संपतराव देशमुख यांच्या सारखा युवा नेते नक्कीच आमदार होईल. भिऊ नकोस तुझ्या पाठीशी आहे, असं सांगणाऱ्या स्वामी समर्थ यांचा आशीर्वाद नक्कीच त्यांच्या पाठीशी राहील. या विभागातील पदवीधर आणि शिक्षक मतदार संघावर भाजपचाच झेंडा फडकेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी सोलापूर जिल्हा अध्यक्ष मा. श्रीकांत देशमुख, नगराध्यक्ष अक्कलकोट मा.भिमाशंकर इंगळे, नगराध्यक्ष मा.किरण केसर,अक्कलकोट उपनगराध्यक्ष मा. यशवंत घोंगडे, पक्ष नेता अक्कलकोट नगर पंचायत मा. महेश हिंडोळे, महिला तालुका अध्यक्ष मा. सुरेखा होळीकरी, तालुका अध्यक्ष अक्कलकोट मा. मोतीराम राठोड, शहर अध्यक्ष मा. शिवशरण जोजण,तसेच भारतीय जनता पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.