आबाल वृद्धांना मिठाई,फराळ वाटप करुन साजरी केली सामाजिक दिवाळी

176

आकोटः संतोष विणके

संवेदनशील तरुणांची कौतुकास्पद बांधीलकी

बहिन भावाच्या नात्यातील एक पवित्र सण म्हणजे भाउबीज. या दिवशी बहिन भावाला ओवाळते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. त्या नंतर बहिन भावाला भेट वस्तु देते आणि भाऊ बहिनीला भेट वस्तु देतो. गोडधोड़, मिठाई,पूरण पोळी आणि बरेच पकवान जेवना मधे करण्यात येतात, पण अकोट मधील काही युवकांनी भाऊबीज निमित्ताने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला. निराधार आबालवृध्दामना रात्री च्या वेळी पोटभर जेवन देऊन त्यांनी हा सण साजरा केला

. खरच अश्या पद्धतीने ही सामाजील बांधिलकी जोपासणारे युवक या समाजात आहेत, याचे सर्वत्र कौतूक होत आहे. एकीकडे सर्वजन आपल्या कुटुंबा सोबत भाऊबीज साजरी करीत होते, त्या वेळस हे मित्र रात्रि च्या वेळी निराधार आबालवृद्धांना जेऊ घालत होतेविशेष म्हणजे निस्वार्थी वृत्तीने समाजातील दुर्लक्षीत निराधारांना मायेचा आधार देण्यासाठी हा उपक्रम राबविल्याचे युवकांनी सांगितले. समाजाच आपल्याला काही देण लागते हीच सामाजिक बांधीलकी जोपासत अकोट मधील मुन्ना साबळे, योगेश वाकोड़े, सुशील तायड़े,श्रीकांत साबळे, राजेश चांदूरकर व साजिद अली यांनी हा उपक्रम राबविला.

जाहिरात