पुणे पदविधर मतदार संघाचे भाजपा युवा उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांचा माजी आमदार सुरेश हाळवणकर,भगवानराव साळुंखे, जिल्हाध्यक्ष रणजितसिंह घाटगे यांच्या समवेत कोल्हापूर जिल्ह्यात झंझावती दौरा

जाहिरात

सांगली / कडेगांव
कोल्हापूर जिल्ह्यात सर्वच तालुक्यातून भाजपला मताधिक्य मिळणार आहे. यापूर्वी देखील या मतदार संघावर भाजपचाच विजय होईल, यात आता कोणतीही शंका राहिली नाही. चंदगड आजरा तालुक्यातून मताधिक्याने काम करू असा विश्वास माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी व्यक्त केला.

शुक्रवारी कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा, चंदगड, गडहिंग्लज, भुदरगड तालुक्यात प्रचार दौरा झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाडगे, माजी आमदार भगवानराव साळुंखे, अशोक होटगी आदींसह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

हाळवणकर म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शिक्षण प्रणालीत बदल केले. आता प्रत्येक विद्यार्थी आत्मनिर्भर बनेल. भाजप बाबत सध्या जनमत तयार आहे. केवळ आपल्याला ते मतदान केंद्रावर नेऊन कार्यकर्त्यांनी करून घ्यावे. निवडणूक प्रक्रिया अवघड असते, याबाबत सतर्क राहणे गरजेचे आहे. यामध्ये पसंती क्रमांक एकचे मत संग्रामसिंह देशमुख यांना द्यावे.

जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाडगे म्हणाले, तरूण विचारांचे युवा उमेदवार भाजपने संग्रामसिंह देशमुख यांच्या रूपाने दिला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि तळागाळात काम करण्याचा त्यांना मोठा अनुभव आहे. संग्रामसिंह देशमुख खूप चांगल्या पद्धतीने काम करतील, कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपचे खाते संग्रामसिंह देशमुख यांच्या रूपाने उघडणार असल्याने आम्ही पूर्ण कोल्हापूरकर मोठ्या ताकदीने या निवडणुकीत उतरलो असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

अशोक होटगी म्हणाले, देशमुख घराण्याचा तालुक्यात संबध आहे. येथील सूत गिरणीसाठी यापूर्वी त्यांनी निधी मिळवून दिला आहे. त्यामुळे त्यांचा कामाचा आवाका आम्हाला ठाऊक आहे. संग्रामसिंह देशमुख यांना निवडून देण्याची आम्ही याठिकाणी जबादारी घेतो. आजरा तालुक्यातील सर्वाधिक मतदान आम्ही देशमुख यांना देऊ अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिला.

माजी आमदार भगवानराव साळुंखे म्हणाले, १०५ आमदार असून देखील विरोधी पक्षात बसावं लागलं याचा वचपा आपण संग्रामसिंह संपतराव देशमुख यांना निवडून देऊन काढू. , नरेंद्र मोदींनी केलेल्या कामाची पोहच पावती म्हणून बिहार निवडणुकीचे यश मिळाले आहे. आता या निवडणुकीत सुद्धा आपण ताकदीने पदवीधरसाठी संग्रामसिंह देशमुख आणि शिक्षक मतदारसंघात जितेंद्र दत्तात्रय पवार यांना निवडून आणू, हे दोन्ही तरुण उमेदवार विधिमंडळात खूप चांगलं काम करतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी जेष्ठ नेते भाजपा बाबा देसाई, माजी जिल्हा अध्यक्ष हिंदुराव शेळके, हेमंत केळकर , अनिता चौगुले, पंचायत समिती सदस्य विठ्ठल पाटील, पंचायत समिती सदस्य प्रकाश पाटील, शहराध्यक्ष राजेंद्र तारळे, महिला शहर अध्यक्ष डॉ. बेनिता डायस, मेघनाथ महाडिक, प्रितम कणसे, तुषार मुरगुडे, अनिल खोत, जयश्री तेली, दीपक कुराडे, आदींसह तालुक्यातील पदवीधर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात