*स्व.संजय कटारिया मेमोरियल ट्रस्ट आणि जगदंब पब्लिक स्कूल चा उपक्रम* मेळघाटातील गरजूंना 6 वर्षा पासून कपडे चे वाटप*

94
जाहिरात

*स्व.संजय कटारिया मेमोरियल ट्रस्ट आणि जगदंब पब्लिक स्कूल चा उपक्रम*

मेळघाटातील गरजूंना 6 वर्षा पासून कपडे चे वाटप*

चांदुर बाजार/ प्रतिनिधी :-

स्व.संजय कटारिया मेमोरियल ट्रस्ट आणि जगदंब पब्लिक स्कूल च्या संयुक्त विद्यमाने मेळघाटातील अतिदुर्गम भागात दिवाळी निमित्ताने कपडे,चिवडा,बिस्किट,स्वेटर आणि जीवनावश्यक वस्तू चे वाटप हतरु .चिलाटी, पटेलढाणा ,कारंजखेडा, या गावात करण्यात आले.तर हा उपक्रम सतत 6 वर्ष पासून सुरू आहे.

देणा-याने देत जावे,मुळात संवेदनशील काळजातून प्रसवलेलं, संस्कारातून जोपासलेलं,आणि मित्रांच्या गोड व जिव्हाळ्याच्या सहवासातून घडलेलं हे समाजभान गेल्या अनेक वर्षापासून आमचा जगदंब मित्र परिवार,स्व.संजय कटारिया मेमोरियल ट्रस्ट आणि जगदंब पब्लिक स्कूल जोपासतोय, वैयक्तिक स्तरावर विविध पक्ष, विचारधारा,असलेले सगळे मित्र, मित्र म्हणून सदैव एक असतो, गट तट जाती पक्षांच्या चौकटीतून बाहेर निघून, अस्सल मानवतावादी दृष्टिकोण ठेवून जगणा-या आमच्या या जगदंब मित्रपरिवाराचे खरच कौतुक शहरात होते आहे.

दरवर्षी प्रमाणे, या वर्षी सुध्दा, स्वत:ची दिवाळी साजरी करतांना, आपल्या हिस्यातला थोडा उजेड, त्यांना पण देवुया ज्यांच नात कायम अंधाराशीच जोडलं गेलय, आपल्या वाट्याचं यश, आपल्या वाट्याची समृध्दी, आपल्या वाट्याचा आनंद थोडा का होईना इतरांनाही द्यावा असा उत्कट उदात्त विचार करणारी आमची ही वेडी मित्रसंपदा म्हणजे जगदंब मित्र परिवार,किमान पन्नास साठ मित्रांचा हा समुहं म्हणजे, प्रचंड सकारात्मक उर्जेचा स्त्रोतच जणू…
प्रत्येक मित्र वेगळा, पण परिवार म्हणून सदैव एकच, लाखमोलाची ही मित्र मंडळी, सारे गेल्या सहा वर्षापासून दिवाळीत मेळघाटामधील गरीब व गरजू लेकरांना नवीन कपडे शा. साहित्य, नवीन ब्यांकेट, महिलांना नवीन साड्या,पुरुषांना धोत्र, सदरा चिवडा बिस्कीट व इतरही जीवनोपयोगी तिजवस्तुंचे वाटप करत असतो, या वर्षी सुध्दा हा सोहळा नुकताच संपन्न झाला.. व प्रचंड मानसिक समाधान व आंतरिक आनंद देवून गेला.. जगण्याच्या खडतर वाटेवरली ही निस्पृही वृत्ती, ही संवेदनशीलता, व चौकटींच्या बाहेरला विचार करणारी वैचारिक अशीच वृध्दिंगत होत जावो.

आपसी स्नेहाचा, कारुण्याचा व जिव्हाळ्याचा हा उजेड, प्रत्येकाचं काळीज, शांत, स्थिर, संयमीत व प्रकाशमय करो.यावेळी स्व संजय कटारिया मेमोरियल ट्रस्ट, चे अध्यक्ष मनोज कटारिया,जगदंब पब्लिक स्कूल चे अध्यक्ष विनोद कोरडे,सुप्रसिद्ध गझलकार नितीन देशमुख,
पत्रकार बादल डकरे, संतोष पोहकार,गजानन चौधरी, विकास सोनार,अवि पोहकार,अतुल रंघुवंशी,मनीष भट्ट,पंकज नागलिया, प्रिंटेश भट्ट,मनीष एकलारे,सोनू भट्ट,राजेश लेंडे, सतीश गुजरकर,उदय देशमुख, किशोर अर्डक,रोशन देशमुख, रमेश तोटे यांचा सहभाग होता.

जाहिरात