शहर वाहतूक शाखेची धडक कारवाई, हेल्मेट सक्ती मोहिमे दरम्यान 350 चे वर दंडात्मक कारवाया

0
536

अकोलाःप्रतीनिधी

अकोला जिल्ह्यात घडणाऱ्या रस्ते अपघातात हकनाक जीव गमविनाऱ्याचा चढता आलेख पाहता मागील 15 दिवसा पासून पोलीस अधीक्षक जी श्रीधर ह्यांचे आदेशानुसार व अप्पर पोलिस अधीक्षक श्रीमती मोनिका राऊत ,उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम ह्यांचे मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन शेळके, उपनिरीक्षक सुरेश वाघ ह्यांनी कर्मचाऱ्यां सह अकोला शहरा लगतच्या राष्ट्रीय व राज्य मार्गावर हेल्मेट सक्ती करून ,हेल्मेट न घालता दुचाकी चालविणाऱ्या विरुद्ध धडक मोहीम राबवून 350 चे वर दंडात्मक कारवाया केल्या, सदर मोहीम राबविण्या मागे दंडात्मक कारवाई करणे हा उद्देश नसून रस्ते अपघातात डोक्याला इजा होऊन होणारे मृत्यू कमी करणे हा उद्देश असून दुचाकी चालकांना हेल्मेट घालण्याची सवय लागावी हा मुख्य उद्देश असल्यासाने नागरिकांनी हेल्मेट घालून सहकार्य करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी केले आहे।