अकोट अकोला महामार्ग ठरतोय समस्यांचा डोंगर

152

लवकर काम सुरु न झाल्यास  राष्ट्रवादी युवक काँग्रेस करणार आंदोलन

आकोटः अनेक महीन्यांपासुनअकोट अकोला महामार्ग बांधकाम समस्यांचा डोंगर ठरत आहे.गेल्या काही दिवसांपासुन या रस्त्याचे काम बंद असल्याने धुळ व मातीचे प्रमाण प्रचंड वाढल्याने मुळे वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे त्यामुळे हा महामार्ग लवकर तयार व्हावा अन्यथा राष्ट्रवादी युवक कांग्रेस कडून आंदोलन करण्यात येण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.
याबाबत आकोट उपविभागीय अधिकारी यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष राम म्हैसने यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.