आ. सतीश चव्हाणांच्या बँनरवरुन स्थानीक मुस्लीम पदाधीकार्याला डावलले !

0
703
Google search engine
Google search engine

आ. सतीश चव्हाणांच्या बँनरवरुन स्थानीक मुस्लीम पदाधीकार्याला डावलले !

उस्मानाबाद / प्रतिनीधी
औरंगाबादच्या पदविधर मतदार संघाच्या महाविकास आघाडिच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी पदविधर व कार्यकरता जिल्हा मेळाव्याच्या मंचावरील पाठिमागे लावलेल्या डिजीटल बँनरवर एकाही स्थानिक नेत्याला स्थान देण्यात आले नसल्यामुळे मुस्लिम कार्यकरत्यानी नाराजी व्यक्त केली.
याबाबत सविस्तर व्रत्त असे कि सध्या औरंगाबाद विभागाची पदविधर मतदार संघांची निवडणूक सुरु आहे.याचे औचित्य साधून महाविकासआघाडीचे उमेदवार आ. सतिश चव्हाण यांच्या प्रचारार्थ दि.26/11/2020 रोजी उस्मानाबाद येथील शुभ मंगल कार्यालयात पदविधर व कार्यकरता जिल्हा मेळाव्या चे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान शुम मंगल कार्यालयातील मांचावर पाठिमागे एक बँनर लावला होता त्या बँनरवर स्थानीक नेत्यांचे एकही फोटो नाहीत.येवढेच नाही तर काँग्रेसचे राहुल गांधी यांचाही फोटो नसल्यामुळे कार्यरत्यातून नाराजीचा सुर दिसत होता.दरम्यान त्या बँनरवर मुस्लीम मंत्री असलेले फक्त दोनच नेत्यांचे फोटो होते. औरंगाबाद येथी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश अध्यक्ष माजि आमदार एम.एम.शेख यांचा आजपर्यत कोणत्याही बँनरवर फोटो दिसला नाही. त्यामुळे माराठवाड्यातील अल्पसंख्यांक समाजातील पदाधीकारी यांचा नाराजीचा सुरु आहे. या कार्यक्रमाच्या आयोजकांनी अशा गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचे वाटते.