विज कायदा -२०२० विरोधात विज कामगारांचे संप पुकारून एल्गार.

258

आकोटः प्रतिनिधी

महावितरण अकोट विभागीय कार्यालय च्या गेट समोर विज कायदा 2020 च्या विरोधात सिटु संलग्न व आयटक सलंग्न संघटना महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी विद्युत वर्कस युनियन व महा. राज्य ई.वर्कर्स फेडरेशन संघटना चे कामगारांनी संपात प्रत्यक्ष उतरुन द्वार सभा घेत सर्वप्रथम 26/11 मुंबई हल्यातील शहीद जवान व नागरीक यांना श्रध्दांजली अपर्ण करण्यात आली त्या नंतर सभेला उद् बोधन करतांना कॉ. राजसिंह गोठवाल यांनी केंद्र सरकार द्ववारा पारित केलेला उर्जा व कामगार विषयक कायदा -2020 चे निषेर्धात असलेला हा कायदा त्वरीत मोडित करण्यासाठी संप करावा असे आवाहन केले. हा संप संघटीत कर्मचारी या पुरता मर्यादित नसुन समाजातिल तळगाळातील नागरिका पर्यत दुषपरिणाम करणारा आहे असे सांगीतले त्यानंतर कॉ. प्रशांत मोहोकार यांनी सदर संपाची व्याप्ती ही केन्द्र सरकाराच्या धोरणा विरोधात आहे असे सांगितले .

कॉ. किरण पवार यांनी संप व कायदा काय आहे याबाबत मार्गदर्शन करतांना सदर कायदा विज वितरण कंपनी याच्यावर केद्र सरकारकडुन कशा प्रकारे दबाव टाकत कर्मचारी कपात व भांडवलदार उदयोगपतीचे भले करणार असुन सदर कायदयाची तुलना रॉलेट कायदा सोबत केली . त्यामुळे सदर कायदया नुसार सर्वसामान्य नागरिक व शेतकरी यांना भविष्यात होणारे दुषपरिणाम याची माहिती दिली व हा संप यशस्वी करण्याकरीता आहवानित केले. कॉ. योगेश वाकोड़े यांनी विज कायदा 2020कामगार व शेतकरी विरोधी कायदा ,व्यस्थीत कामगार यांना संपाचे महत्व समजावुन सांगितले संपा मधे आज देशभरात उर्जा ,रेल्वे,व बँकीग क्षेत्रातील संघटीत व असंघटित कामगार या संपात सहभागी असुन धोरणाचा निषेध नोदविला.व जुनी पेन्शन योजना लागु करावी तिचे फायदे असे सांगितले. कॉ संजय डफळे यांनी संप फक्त का पगारा पुरता मर्यादित नसुन समाजात कशाप्रकारे दुष्परिणाम करून शेतकरी विरोधी असल्या बाबत सांगीतले. कॉ.एम. आर.खान यांनी विज कायदा2020 बद्दल माहिती दिली सदर द्वार सभेला कॉ. साजिद अली,कॉ. स्वप्नील सुदरकार ,कॉ. मनिष डाबरे,कॉ. नरेन्द्र देशमुख ,कॉ अमोल घाटोळ,कॉ. देवेन्द्र थोरात,कॉ.एम.आर.खान, कॉ. उमेश जोध,कॉ. राजेन्द्र पातुर्ड कॉ. विनोद लके,कॉ.एम फारूक,कॉ.शंकर शिंदे कॉ. अजय गजबे कॉ. इंगळे ,कॉ आमित सातळेकर, कॉ श्रीमती शिला सोनोने मॅडम, कॉ. सागोरकार,कॉ. सारिका जयस्वाल मॅडम ,कॉ एम.एस. चांदेकर मॅडम, कॉ. विजय चव्हाण ,कॉ. दिपक हेंड कॉ. प्रशांत मोहोकार विभागीय सचिव महा.राज्य स्वाभिमानी विघुत वर्कर्स युनियन यांनी आभार प्रदर्शन केले