महाराष्ट्र नवक्रांती शिक्षक संघटनेच्या संकेतस्थळाचे व स्वाध्याय अभ्यासिकेचे उद्घाटन

190

आकोटःसंतोष विणके

विभागीय कार्यकारिणीची घोषणा

महाराष्ट्र नवक्रांती शिक्षक संघटनेच्या संकेतस्थळाचे व स्वाध्याय अभ्यासिकेचे उद्घाटन मा. श्री.डॉ. अभय दादा पाटील अकोला http://mnumaha.org.in यांच्या शुभहस्ते करण्यात आले . याप्रसंगी विंज्ञान व अध्यातम्म यांची जीवनातील महत्व सांगितले.तसेच यावेळी संघटनेच्या विभागीय कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.

संघटनेचे कार्यालय,परम आसरा कॉलनी, अकोट येथे दि.26 नोव्हेंबर रोजी मान्यवरांचे उपस्थीतीत हा कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमास जिल्ह्यातील संपूर्ण शिक्षकांच्या उपस्थितीसह सर्व पदाधिकारी तथा तालुकाध्यक्ष उपस्थित होते.

कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून माननीय श्री अभय दादा पाटील हे तर प्रा.एस. के. देशमुख सर प्रा. श्री. गजानन दांदळे सर ,श्री निखाडे सर ,श्री. सुनिल मस्करे सर ,मास्कर सर ,श्री सुनिल वसु सर यांची उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व ( संघटनेचा आढावा परिचय ) महाराष्ट्र नवंक्रांति शिक्षक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष उमेश म्हसाये यांनी केले तर सूत्रसंचालन सौ भांबुरकर मॅडम यांनी केले.कार्यक्रमाला संघटनेचे विभागातील सर्व पदाधिकारी यांचे योगदान लाभले.