अजय आकरे यांची स्थानिक गुन्हे शाखेत बदली – दबंग अधिकारी म्हणून जिल्ह्यात ओळख

0
958

अमरावती /

पोलीस विभागात अनेक अधिकारी असतात मात्र काही जण आपली वेगळीच ओळख किंवा आपल्या कार्याची छाप पडतात यातच अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण पोलीस विभागात काम करणारे अधिकारी अजय आकरे यांच्या बाबतीत आहे.नुकतीच त्यांची बदली स्थानिक गुन्हे शाखेच्या दुय्यम निरीक्षक म्हणून झाली आहे.

सहायक पोलीस निरीक्षक अजय आकरे यांनी आपल्या ठाणेदार म्हणून काम केलेल्या पोलीस स्टेशन मध्ये अनेक धडक कार्यवाही केल्या यामध्ये त्यांनी ब्राम्हणवाडा थडी या ठिकाणी असताना अवैध सागवान ,अवैध गौवंश वाहतूक वर कार्यवाही करत जवळपास 300 जिवंत गौवंश सुटका केली.तर चांदुर बाजार पोलीस स्टेशन येथे ठाणेदार म्हणून कार्यरत असताना त्यांनी बहुचर्चित स्टेट बँक कर्ज प्रकरणात उलगडा लावला यामध्ये त्यांना त्यावेळी अचलपूर उपविभागीय पोलीस अधिकारी (IPS)जयंत मीना यांचे मार्गदर्शन लाभले.तर आसेगाव या ठिकाणी मुरलीधर महाराज प्रकरण चा तपास देखील अजय आकरे यांनी आसेगाव ला पोलीस निरीक्षक असताना यशस्वी पार पाडला तर तामसवाडी येथील अवैध वाळू प्रकारणत त्याची दबंग कार्यवाही सर्वाना माहिती आहे.त्यानंतर प्रो. आयपीएस समीर शेख यांच्या कृषी उत्पन्न बाजार समिती मधील अवैध गौवंश तस्करी च्या कार्यवाही चा तपास देखील आकरे यांनी केला होता.

यवतमाळ ला बदली झाल्यानंतर त्यांची पुन्हा अमरावती ग्रामीण पोलीस बदली झाली अमरावती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ हरी बालाजी एन यांच्या मार्गदर्शनाखाली खाली अजय आकरे यांच्या विशेष पथक यांनी जवळपास अनेक धडक कार्यवाही करत यामध्ये जुगार,गुटखा,गांजा,दारू,गौवंश ,अवैध वाळू तस्करी,बोगस बियाणे,शासकीय धान्य अवैध वाहतूक वर धडक कार्यवाही करत जवळपास 1 करोड 32 लाखाचा मुद्देमाल जप्त केला ते 100 हुन अधिक आरोपी याना अटक केली.

नुकतीच त्यांची बदली अमरावती स्थानिक गुन्हे शाखेच्या दुय्ययम पोलीस निरीक्षक म्हणून झाली आहे तर त्यांनी 15 दिवसात जिल्ह्यातील चोरी जाणाऱ्या मोटरसायकल रॅकेट पर्दापश करत 3 आरोपी यांच्या ताब्यातून 20 मोटरसायकल ताब्यात घेत जवळपास 15 लाखाचा मुद्देमाल जप्त केले आहे.त्यामुळे ते पुन्हा चर्चेत आले आहे.तर जिल्ह्यातील चांदुर बाजार,ब्राम्हणवाडा थडी,आसेगाव, तिवसा, परतवाडा शिरजगाव कसबा या ठिकाणी सुरू असलेल्या अवैध धंदे वर त्यांचा शिकजा कधी येणार अशी चर्चा सुरू आहे..