आकोट पालीकेद्वारा स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन

0
860

आकोट :संतोष विणके

आकोट नगर परिषदेद्वारा स्वच्छ सर्वेक्षण अभियान २०२१अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना प्रमाणपत्र,विजेत्यास रोख बक्षिस व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
आकोट शहरात स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत शहरातील शाळा, कार्यालये,सोसायटी,हाॕटेलसह इतर ठिकाणी स्वच्छतेच्या प्रती जनजागृती व्हावी, प्लाॕस्टीकचा वापर टाळावा,पाण्याची नासाडी कमी व्हावी अशा विविध अनुषंगाने भित्तीपञे,पथनाट्य,जिंगल,पोस्टर व चिञकला, शार्ट फिल्म,टाकाऊ मधुन टिकाऊ स्पर्धा अशा विविध स्पर्धा आयोजीत करण्यात आल्या असुन या स्पर्धा ३ महिन्याच्या कालावधीत घेण्यात येणार आहेत
.या स्पर्धेत सहभागी होण्याकरीता स्पर्धकांनी आपल्या नावाची नोंदणी नगर परिषदेच्या आरोग्य विभागात करावी अथवा ई-मेलच्या माध्यमातुन विविध स्पर्धेमध्ये सहभागी होता येईल.

स्वच्छ सर्वेक्षण अभियान,वैयक्तिक स्वच्छता,वेस्ट टु बेस्ट, होम कंम्पोंस्टींग,कचरा वर्गीकरण,हगणदारी मुक्त शहर,सिंगल युस प्लॕस्टीक बॕग,स्वच्छ आकोट सुंदर आकोट या विषयावर ही स्पर्धा आयोजीत करण्यात आली आहे.सहभागी स्पर्धकामधुन प्रथम,व्दितीय आणी तुतिय येणाऱ्या विजेत्यास रोख बक्षिस व प्रमाणपत्र तसेच सहभागी स्पर्धकास प्रमाणपञ देण्यात येणार आहे.नोव्हेंबर महिन्यामध्ये पोस्टर व चिञकला,शार्ट फिल्म, वेस्ट टु बेस्ट,डिसेंबर महिन्यामध्ये निबंध स्पर्धा,रागोंळी स्पर्धा, पथनाट्य स्पर्धा तर जानेवारी महिन्यामध्ये स्वच्छ आकोट सुंदर आकोट,होम कंपोस्टींग, हगणदारी मुक्त शहर, कचरा वर्गीकरण हे विषय राहणार आहे, अधिक माहिती करीता प्रभारी पाणी पुरवठा,जलदाय व स्वच्छता अभियंता सिध्दार्थ मोरे,स्वच्छ अभियान समन्वयक अक्षय ढोरे यांचेशी संपर्क साधावा तसेच स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन नगराध्यक्ष हरिनारायण माकोडे, मुख्याधिकारी श्रीकृष्ण वाहुरवाघ,व आरोग्य सभापती यांनी केले आहे.

शहर स्वच्छतेत आग्रही रहावे,येणाऱ्या पिढीवर स्वच्छतेचे संस्कार व्हावे या अनुषंगाने स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्पर्धा ठेवण्यात आल्या आहेत या स्पर्धेत शाळा,महाविद्यालय,युवक,युवतींनी सहभागी होऊन स्वच्छतेत योगदान नोंदवावे.

श्रीकृष्ण वाहुरवाघ
मुख्याधिकारी आकोट

आकोट नगर परिषदेत स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबविले जात असुन शहराच्या स्वच्छतेसाठी प्रत्येकाचा सहभाग महत्त्वाचा आहे शहराच्या नागरिकांच्या मनात स्वच्छतेच्या अनुषंगाने काय भावना आहेत त्या या स्पर्धेतुन व्यक्त व्हाव्या याकरीता सर्वानी सहभागी व्हावे.

हरिनारायण माकोडे नगराध्यक्ष आकोट