अमरावती ब्रेकिंग :- पोलीस उपनिरीक्षक ने मागितली 2 लाखाची लाच ..? , खासगी इसम ACB च्या जाळ्यात , गुन्हा दाखल ची कार्यवाही सुरू

0
1828
Google search engine
Google search engine

▶तक्रारदार – पुरूष, वय 51 वर्ष, रा. अमरावती
▶आरोपी – 1) गणेश अहिरे , पद- पोलीस उपनिरीक्षक , पो. स्टे. गाडगेनगर अमरावती शहर वर्ग 3
2) अशोक उर्फ पप्पु धनराज रावलानी, वय 51 वर्ष, खाजगी इसम, रा. अमरावती
▶लाच मागणी रक्कम- 2, 00, 000 रुपये तडजोडीअंती 1, 00, 000 रुपये
▶पडताळणी- दि. 04/08/2020
▶️लाच स्वीकारण्याचा प्रयत्न –
दि. 07/08/2020
▶घटनस्थळ – हॉटेल व्हाईट कैसल समोर, मोर्शी रोड, अमरावती
▶कारण – यातील तक्रारदार यांनी दिनांक 04/08/2020 रोजी दिलेल्या तक्रारीचे अनुषंगाने करण्यात आलेल्या पडताळणी दरम्यान तक्रारदार यांना पो.स्टे. गाडगेनगर अमरावती शहर येथे दाखल बनावट दारूचे गुन्हामध्ये अटक करून आरोपी न कारणेकरिता पी.एस.आय. अहिरे व खाजगी इसम पप्पु रावलानी यांनी 2, 00, 000 रुपयाची मागणी करून तडजोडीअंती 1,00,000 रुपये स्वीकारण्याचे मान्य करून नियोजित ठिकाणी येऊन लाच स्वीकारण्याचा प्रयत्न केला . आरोपी क्र. 2 ला ताब्यात घेण्यात आले असुन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

मार्गदर्शन –
▶मा. श्री. विशाल गायकवाड , पोलीस अधिक्षक, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परीक्षेत्र अमरावती
➡तपासी अधिकारी- पोलीस उपअधिक्षक श्री गजानन पडघन
▶कारवाई पथक – पोलीस उपअधिक्षक श्री गजानन पडघन,
स पो.उपनि.श्रीकृष्ण तालन , पोना सुनील वऱ्हाडे पो.कॉ. अभय वाघ, पो. कॉ. महेंद्र साखरे चालक पो ना चंद्रकांत जनबंधू
▶हैश वैल्यु घेण्यात आली आहे.
▶️ *आलोसे यांचे सक्षम अधिकारी* –
मा वि पो म नि सा , परिक्षेत्र अमरावती.
—————————————-
*सर्व नागरीकांना आवाहन* *करण्यात येते की, कोणत्याही* *शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करुन देण्यासाठी लाचेची मागणी* *केल्यास तात्काळ संपर्क साधावा.*
लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, परांजपे कॉलनी, अमरावती.
*@दुरध्वनी क्रं – 917212 553055*
*@टोल फ्रि क्रं 1064*
—————————————-