पुणे पदवीधर मतदार संघात भाजपाचा विजय निश्चित आहे. भाजपा व मित्र पक्षाचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख :

सांगली/कडेगांव

पुणे पदवीधर विधानपरिषद मतदार संघात भारतीय जनता पक्षाची यंत्रणा, आम्ही केलेला प्रचार आणि पाचही जिल्ह्यांमध्ये असणाऱ्या संबंधांमुळे माझा विजय निश्चित आहे, असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे आणि मित्र पक्षाचे उमेदवार संग्रामसिंह संपतराव देशमुख यांनी व्यक्त केला.

देशमुख म्हणाले, भारतीय जनता पक्ष, आरपीआय, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम, रयत क्रांती संघटना व जनसुराज्य पक्ष यांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला पुणे पदवीधर विधानपरिषदेची उमेदवारी दिली. माझ्यावर पक्षांनी जो विश्वास दाखवून मला ताकद दिली, तो मी सार्थ करून दाखवेन असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

ते म्हणाले, या मतदार संघात पुणे, सातारा, कोल्हापूर ,सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात सर्व ५८ तालुक्यात मी प्रचार केला, इतक्या तालुक्यात अवघ्या १५ दिवसात प्रचार करणारा मी एकमेव उमेदवार असेन,
सर्व ठिकाणी मला प्रचाराला मोठा प्रतिसाद देखील मिळतो आहे. माझ्यासाठी माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देव देवेंद्र फडणवीस, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, पाचही जिल्ह्यातील पक्षाचे आमदार, खासदार, पदवीधर निवडणूक प्रमुख राजेश पांडे, मकरंद देशपांडे, सर्व जिल्हाध्यक्ष, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पांचायत समिती सदस्य, पक्षाशी संलग्न संस्था, संघटना, तालुकाध्यक्ष अशी भली मोठी पक्षाची यंत्रणा सध्या काम करते आहे.

मतदार संघात फिरताना अनेक पदवीधर युवक , युवती, संघटनाचे प्रमुख भेटले यातून अनेक समस्या समजून घेता आल्या. प्रचारात बेरोजगारी, स्किल डेव्हलपमेंट, स्वतंत्र पदवीधर मंत्रालय, पदवीधर व्यावसायिक वित्त पुरवठा, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, नवीन भरती या सारखे विषय प्रचारात घेऊन पदवीधर मेळाव्यात युवकांना या मुद्द्याचे पालन करण्याचे आश्वासन दिले. पाच ही जिल्ह्यात असणारा संपर्क, भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्यातील पदाधिकारी, संघ परिवार, विदयार्थी परिषद, महिला मोर्चा यांच्या नियोजनाने प्रचार शगेला पोहचला, लोकांमध्ये माझा विजय निश्चित झाला आहे. भाजपच्या विजयाची आता केवळ औपचारिकता बाकी राहिली असल्याचेही संग्रामसिंह देशमुख यांनी सांगितले.

महाजनसंपर्क अभियानात लाखो कार्यकर्ते मतदारांपर्यंत

पक्षाने सुरू केलेल्या महाजनसंपर्क अभियानातून आज लाखो कार्यकर्ते आपल्या मतदारांपर्यंत पोहचले आहेत. प्रत्येकी पन्नास मतमागे एक कार्यकर्त्या या प्रमाणे आमचे प्रदेशाध्यक्षापासून सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत प्रत्येक जिल्ह्यात मतदारांपर्यंत पोचण्यासाठी महाजनसंपर्क अभियान सुरू केलं आहे, याचाही फायदा मतदानात होणार असल्याचे संग्रामसिंह देशमुख यांनी सांगीतले.
_________________________________:_.