अमरावती ब्रेकिंग :- रायपूर वरून सुरत जाणाऱ्या ट्रॅव्हल्स ने घेतला अचानक पेट – ट्रॅव्हल्स जळून खाक

3123

तिवसा :-

अमरावती – रायपूरकडून सुरतच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रॅव्हल्स ने  अचानक पेट घेतला. ही बस पूर्णतः जळून खाक झाल्याची घटना अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास तिवसा पोलीस ठाण्यासमोर घडली घडली. सुदैवाने बस चालकाच्या प्रसंगवधानाने मोठा अनर्थ टळला. बसमधील सर्व  प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.

अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्ग सहावर रात्री 2 वाजण्याच्या सुमारास महेंद्र ट्रॅव्हल्स (CG 19 AF 0231) बस रायपूरहून प्रवासी घेवून नागपूर, अमरावतीमार्गे सुरतकडे निघाली होती. दरम्यान, नागपूर ते अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील तिवसा पोलीस ठाण्याच्या समोर अचानक या बसने पेट घेतला आहे

जाहिरात