*शिरसगाव कसबा येथील ३ डिसेंला होणारा कार्तिक त्रिजटा रथउत्सव व विविध कार्यक्रम रद्द!

0
716

*शिरसगाव कसबा येथील ३ डिसेंला होणारा कार्तिक त्रिजटा रथउत्सव व विविध कार्यक्रम रद्द!

अमरावती :-

सिरजगाव कसबा येथे ३ डिसें.ला होणारा परंपरागत त्रिजटा उत्सव व रथयात्रा कोरोनाच्या पार्श्वभुमीवर रद्द करण्यात आली आहे.

                जिल्ह्यातील आध्यात्मिक उत्सवामध्ये सर्वात मोठा उत्सव हा चांदुर बाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा येथे कार्तिक त्रिजटा रथ उत्सव  होत असल्याची प्रशासनाकडे नोंद आहे. हा रथ उत्सव पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिक प्रचंड गर्दी करीत असतात मेघा नदीच्या तीरावर शिरजगाव या गावी कार्तिक साई स्वामींचे भव्य मंदिर असून कोजागरी पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत या  कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रम गावातील सर्वच मंदिर  तसेच प्रत्येक नगरामध्ये होत असतो. त्यामध्ये प्रभात काकडा आरती भागवत सप्ताह आणि कार्तिक त्रिजटा महोत्सव समाप्तीला  सिरजगाव कसब्यात मोठ्या प्रमाणात महाप्रसाद व शोभायात्रेचे आयोजन करण्यात येते

यात पंचक्रोशीतील हजारो भाविक सहभागी होतात. गेल्या कित्येक वर्षापासून सुरु असणारा हा पारंपारिक महोत्सवाला यावर्षी खंड पडणार असून येणाऱ्या 3 डिसेंबर रोजी तिथीप्रमाणे साजरा होणारा गावातील कार्तिक त्रिजटा रथ उत्सव कोरोना प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी  कोरोना संसंर्गाच्या दुसर्‍या लाटेच्या शक्यतेमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने 23 नोव्हेंबरला नव्याने आदेश काढून यात्रा समारंभ महोत्सव सांस्कृतिक कार्यक्रम यावर परवानगी नाकारली आहे व तसे संबंधित पोलीस प्रशासन महसूल प्रशासन स्थानिक स्वराज्य संस्था यांना कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहे