नगराध्यक्ष पदी नितीन कोरडे यांची निवड, सर्वंधिक संख्याबळ असून देखील भाजप सत्तेपासून दूर

0
729
Google search engine
Google search engine

चांदुर बाजार नगर परिषद वर प्रहार चा झेंडा

नगराध्यक्ष पदी नितीन कोरडे यांची निवड, सर्वंधिक संख्याबळ असून देखील भाजप सत्तेपासून दूर

चांदूर बाजार –

स्थानिक नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या पोटनिवडणुकीत प्रहार गटाचे नितीन कोरडे यांची वर्णी लागली. त्यांना प्रहार, राष्ट्रवादी काँग्रेस, व अपक्ष अशी ९ नगरसेवकांची मते मिळाली. तर भाजप चे गोपाल तिरमारे याना ८ मत मिळाले. विशेष म्हणजे पालिकेत भाजप चे सर्वाधिक नगरसेवक असूनही भाजपला सत्ता टिकवून ठेवण्यात अपयश आले.

दिवंगत नगराध्यक्ष रविंद्र पवार यांचे निधनाने रिक्त झालेल्या अध्यक्ष पदासाठी आज नगरपालिका सभागृहात पोटनिवडणुक घेण्यात आली. यामध्ये भाजप तर्फे गोपाल तिरमारे तर प्रहार गट तर्फे नितीन कोरडे यांनी अर्ज दाखल केले होते. पालिकेचे संख्याबळ पाहता भाजप ७, प्रहार ४, राष्ट्रवादी काँग्रेस चे २, अपक्ष ४ असे आहे. यात दिवंगत नगराध्यक्ष रविंद्र पवार हे थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडून आले होते. मात्र त्यांचा निधनानंतर रिक्त जागेवर आज झालेल्या निवडणुकीत प्रहार गटाचे नितीन कोरडे यांची ९ नगरसेवकांचे समर्थनाने निवड झाली. तर भाजपचे गोपाल तिरमारे याना ८ मते मिळाली.

नितीन कोरडे याना प्रहार चे सरदार खा, फातिमा बी, उषा माकोडे, वैशाली खोडपे, राष्ट्रवादि काँग्रेस चे आबीद हुसेन, चंदा खंडारे, तसेच अपक्ष नगरसेवक लविना आकोलकर, नजीर कुरेशी अशी ९ नगरसेवकांची मते मिळाली. तर भाजप चे गोपाल तिरमारे याना अतुल रघुवंशी, विजय विल्हेकर, टिकू अहिर, मीना काकडे, मीरा खडसे, वैशाली घुलक्षे सह अपक्ष मनीष नांगलिया यांची ८ मते मिळाली. नितीन कोरडे यांचा विजय जाहीर होताच प्रहार कार्यकात्यानी एकच जल्लोष केला.

निवडणूक प्रक्रिया ही अचलपूर उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांच्या पार पाडली तर ठाणेदार सुनील किंगणे यांच्या नेतृत्वाखाली विभागातील पोलीसाचा चोख बंदोबस्त होता.तर दिवंगत नगराध्यक्ष रवींद्र पवार यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून नगराध्यक्ष नितीन कोरडे यांनी त्याना श्रद्धांजली अर्पण केली.रवींद्र पवार यांच्या विकासात्मक कार्याला गती देणार असल्याचे कोरडे यांनी प्रतिनिधी शी बोलताना सांगितले.