*उदयाला नगरसेविका लविना आकोलकर करणार ठिय्या आंदोलन*

0
490
Google search engine
Google search engine
84 दुकानाचे अतिक्रमण काढा अन्यथा आत्मदहन करणार :-लविना आकोलकर
15 दिवसाचा दिला नगर परिषद ला अलतिमेटम
चांदूर बाजार :-
              नुकतेच चांदुर बाजार नगर परिषद हद्दीतील अतिक्रमण काढण्यात आले. मात्र स्टेट बँक ऑफ इंडिया च्या लाईन मधील 84 दुकान त्यांच्या कडून 15 वर्षात कुठला टॅक्स घेतला गेला नाही यावर नगर परिषद चे मुख्याधिकारी यांनी कार्यवाही का केली नाही तसेच नियमानुसार असलेल्या दुकानदार यांचे दुकान पाडण्यात आले. हे नियम बाह्य काम मुख्यधिकारी यांनी केले अशा आरोप नगरसेविक आकोलकर यांनी केला आहे.
             19 नोव्हेंबर ला शहरातील अतिक्रमण काढण्यात आले मात्र त्या 84 दुकान वर मुख्यधिकारी यांनी कार्यवाही केली नाही त्यामुळे त्यांनी 15 दिवसात  त्या दुकान चे अतिक्रमण काढले नाही तर  आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. तसेच ज्या दुकानदार यांचे दुकान कोणतीही नोटीस,किंवा पूर्वसूचना न देता पाडण्यात आले त्यांना सोबत घेऊन दिनांक 1 डिसेंबर ला ठिय्या आंदोलन करणार असल्याचं इशारा लविना आकोलकर यांनी आपल्या पत्रात दिला आहे.त्यांनी 84 दुकान वर कार्यवाही व्हावि यासाठी राज्यमंत्री बच्चू कडू याना देखील निवेदन दिले आहे.तसेच अतिक्रमण जर 15 दिवसात काढले नाही काही अनुचित प्रकार घडला  तर याला जबाबदार मुख्याधिकारी राहणार आहे असे त्यानी आपल्या पत्रात म्हटले आहे.
फोटो:- आकोलकर यांचा फोटो मेल केला आहे.