मोर्शी येथे शासकीय कापूस खरेदी केंद्राचा आमदार देवेंद्र भुयार यांच्या हस्ते शुभारंभ !

0
930
मोर्शी येथे शासकीय कापूस खरेदी केंद्राचा आमदार देवेंद्र भुयार यांच्या हस्ते शुभारंभ !
कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा शाल श्रीफळ देऊन केला सत्कार !
मोर्शी तालुका प्रतिनिधी :
          मोर्शी तालुक्यामध्ये कापसाची पेरणी मोठ्या प्रमाणात झाली असून कापूस वेचणीला महिन्यापासून प्रारंभ झाला. मोठ्या प्रमाणात कापसाची वेचणी होऊन कापूस शेतकऱ्यांच्या घरात येऊन पडला होता. मोर्शी वरुड तालुक्यात या वर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे कपाशीचे चांगले उत्पादन आले आहे. परतीच्या पावसाने घातलेल्या धुमाकुळामुळे शेतातच कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अशा परिस्थितीतही शेतकऱ्यांनी कापूस जोपासला. मात्र सीसीआयचे शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू झाले नसल्याने केवळ साडेचार हजार रूपये क्विंटलने खासगीत व्यापारी कापसाची खरेदी करत असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत होती. आधीच करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळे शेतकरी संकटात आहे. अशात कापूस पडून असल्याने शेतकरीदेखील चिंतेत सापडले होते . तेव्हा या संकटाच्या काळात सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र सुरू करून शेतकऱ्यांचा कापूस खरेंदी करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे केली होती. शासनाने आमदार देवेंद्र भुयार यांच्या मागणीची दखल घेऊन शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू केले असून मोर्शी तालुक्यात कापसाचे उत्पादन क्षेत्र मोठ्या प्रमाणात असून शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू झाल्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम शासनामार्फत सुरू असल्याचे प्रतिपादन आमदार देवेंद्र भुयार यांनी केले.
मोर्शी तालुक्यात पणन च्या कापूस खरेदीला सुरुवात झाली असून गेल्या अनेक दिवसांपासून कापूस खरेदी केंद्र उघडण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे . शेतकऱ्यांच्या कापसाला ५८५० रुपये भाव मिळत असून मोर्शी तालुक्यात १०० शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून ३०० क्विंटल कापूस पहिल्या दिवशी खरेदी करण्यात आला.
 कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी  कृषि उत्पन्न बाजार समिती, मोर्शी येथे सन २०२०-२०२१ साठी शासकीय हमीभाव योजना (MSP) वर कापूस उत्पादक शेतकऱ्यांची नोंदणी सुरू झालेली आहे. तरी शेतकऱ्यांनी कृषि उत्पन्न बाजार समिती मोर्शी येथे येऊन क्रमवारीने नोंदणी करून घेण्याचे आवाहन आमदार देवेंद्र भुयार यांनी केले.
         महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस पणन महासंघा तर्फे मोर्शी येथील जगदंबा जिनिंग प्रेसिंग येथे शासकीय कापूस खरेदी केंद्राच्या शुभारंभ आमदार देवेंद्र भुयार यांच्या हस्ते करण्यात आला असून यावेळी कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा शाल श्रीफळ देऊन आमदार देवेंद्र भुयार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
 यावेळी आमदार आमदार देवेंद्र भुयार, मोहन मडघे, नगरसेवक डॉ.प्रदीप कुऱ्हाडे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष नरेंद्र जिचकार, राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष अतुल उमाळे, उमेश गुडधे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक प्रकाश विघे , स्वाभिमानी शेतकरी संघटना तालुकाध्यक्ष हितेश साबळे, नगरसेवक नितीन पन्नासे, नगरसेवक रवि गूल्हाने, पंकज विधळे, जयप्रकाश अब्रोल, संदीप रोडे, डॉ. गजानन चरपे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव लाभेश लिखितकर, जगदंबा जिनिंगचे प्रफुलजी ढोक, आशिष दीक्षित, मंगेश चावडे, कमलेश बरडे, अंकुश घारड, घनश्याम शिंगरवाडे, अनिकेत राऊत, रवी मानकर, राहुल टाके, अतुल टाके, मंगेश मनोहरे, नीलेश ठवळी, पवन मंत्री, सागर बेले, चव्हाण भाऊ, प्रदीप साठवणे, अविनाश खडसे, प्रमोदजी खडसे, अक्षय कडू, अंशुल साहू, अक्षय टेटू , प्रकाश ठाकरे, प्रदीप इंगळे, हितेश उंदरे, प्रफुल खडसे यांच्यासह कापूस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.