दिवाळीचा आनंद दिवाळीनंतर ही चेहऱ्यावर कायम

0
366

स्वयंसेवकांची रस्त्यावरील ‘त्या’ समाज बांधवांसोबत दिवाळीनंतर ही दिवाळी साजरी

दिवाळीचा आनंद दिवाळीनंतर ही चेहऱ्यावर कायम

दिनांक :१ डिसेंबर २०२०

शेगांव (श. प्र.) :- दिवाळीचा आनंद आपल्या व दिवाळीपुरता मर्यादित न ठेवता समाजातील दुर्लक्षित समाजल्या जाणाऱ्या, रस्त्यावर फिरणाऱ्या बांधवां सोबत हा सण साजरा करण्याचा निर्धार करून शेगांव येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महाविद्यालयीनच्या स्वयंसेवकांनी शहरातील रस्त्याच्या कडेवरील समाज बांधवां सोबत त्यांच्या पालांवर वस्त्यांवर जाऊन त्यांना दिवाळीचे फराळ, व मिठाईचे वाटप दिवाळीनंतर करित पुनः दिवाळी साजरी केली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महाविद्यालयीन शाखेच्या माध्यमातून रस्त्याकडेतील, गरीब, वनवासी, मनोविकलांग समजल्या जाणाऱ्या समाज बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणताना इतरांप्रमाणेतेही या समाजाचा घटक आहेत याची जाणीव वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न असून दिवाळीसारख्या सणात सर्वत्र आनंदी आनंद असताना भटक्यांची दिवाळी ही तशीच व्हावी या उद्देशाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शेगावच्या वतीने यावर्षी विविध वस्त्यांमध्ये, रस्त्याच्या शेजारी असलेल्यांना दिवाळीचा सण साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि पूढे सरसावले महाविद्यालयीन स्वयंसेवक बंधू !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपल्या ‘उपक्रम’ नामक अभियानाच्या माध्यमातून वेळोवेळी समाजपयोगी कार्य करीत आले आहेत. संघाचे महाविद्यालयीन कार्यकारणी पर्यंतचे अधिकारी आणि स्वयंसेवक या कार्यक्रमांमध्ये उत्साहाने आणि आपले कुटुंबाचे सदस्य समजून सहभागी झाले होते. प्रत्येक स्वयंसेवकानी आपल्या घरी तयार होणाऱ्या फराळाचा एक वाटा वेगळा काढून ठेवला व सर्व गोळा करून त्याचे पाकीट बनवून रात्रीच्या समयी रस्त्यावरील ‘त्या’ समाज बंधवाजवळ जावून पाकीटाचे वाटप केले तर फराळाचे वाटप करतांना वस्तीतील मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहतांना दिसत होता तर स्वयंसेवकांच्या चेहऱ्यावर होते ते समाधान देशसेेवेचे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या उपक्रम अभियानाच्या माध्यमातून सामाजिक जाणीव आणि संवेदनशीलतेचा परिचय या उपक्रमाद्वारे मिळतो. समाजाप्रती असणारा सद्भाव आणि सण-उत्सव हे सर्वांनी मिळून साजरे करावेत अशी संकल्पना प्रत्यक्षात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक बंधुंनी साकारलंय… राष्ट्रहित, समाजहित यासाठी सदैव अग्रेसर असणारे आपले स्वयंसेवक बंधू अभिनंदनास पात्र आहेत.

संघाच्या महाविद्यालयीन च्या स्वयंसेवकांनी दिवाळीनंतर पुनः दिवाळी साजरी करून ‘त्या’ समाज बांधवांची दिवाळी पुनः गोड केली हा उपक्रमात संघाची शिवनेरी वस्ती, श्री संत गजानन महाराज वस्ती, संत सावता वस्ती, छत्रपती शिवाजी महाराज वस्तीच्या स्वयंसेवकांनी भाग घेतला.