आकोटमध्ये सलग दुसऱ्या दिवशी वाहनांवर कारवाई

0
639
Google search engine
Google search engine

आकोटः प्रतिनिधी

अकोट शहर वाहतूक पोलिसांनी 86 वाहनांवर शुक्रवार
दि. 4 .रोजी कारवाई केली.गुरवारी जिल्हा वाहतुक शाखेने आकोट मध्ये 85 वाहनांवर कारवाई केली होती.तर शुक्रवारी दुसऱ्या दिवशी आकोट शहर वाहतुक पोलीसांनी वाहनांवर कारवाई केल्याने सलग दुसऱ्या दिवशी वाहनधारकांमध्ये खळबळ उडाली आहे.रस्ते अपघात कमी करण्यासाठी शहरातील अवैध प्रवासी वाहतूक करणारे 29 वाहन
तसेच चालू वाहनांवर मोबाईलवर बोलणे, सीट बेल्ट न लावणे,विना लायसन वाहन चालविणे, बेदरकारपणे वाहन चालवणे अशा व इतर कलमान्वये 57 वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.
अशा एकंदरीत 86 वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली सदर कारवाई पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय जवरे हेड कॉन्स्टेबल विश्वनाथ शेंडे पोलीस कॉन्स्टेबल सुनील नागे पोलीस कॉन्स्टेबल आशिष नांदोकार पोलीस कॉन्स्टेबल गणेश फोकमारे यांनी केली.