आमरण उपोषणाच्या चौथ्या दिवशी शेटे महाराजांची प्रकृती खालावली….

0
798
Google search engine
Google search engine

किर्तन व धार्मिक कार्यक्रमासाठी आमरण उपोषण

आकोटः संतोष विणके

आमरण उपोषणाच्या चौथ्या दिवसाला सरकारचे दुर्लक्ष असल्यामुळे सर्व वारकरी मंडळींनी काळ्या फीती लाऊन ऊपोषन केले असून गणेश महाराज शेटे यांची प्रकृती उपोषणाच्या चौथ्या दिवशी खालावल्याने डॉक्टरांनी दवाखान्यात भरती होण्याचा सल्ला दिला.मात्र मागण्या मान्य झाल्याशिवाय दवाखान्यात न जान्याचा शेटे महाराजांनी निर्धार केला.आ.अमोल मिटकरी व राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांनी भेट दिली व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार व अमोल मिटकरी यांची मोबाईलद्वारे चर्चा झाली. ना. जयंत पाटील व शेटे महाराज यांच्याशी फोनवर चर्चा करण्यात आली आठ दिवसानंतर मुख्यमंत्री साहेबांची चर्चा करून निर्णय देण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र लेखी स्वरूपात आश्वासन असल्या शिवाय आमरण उपोषण मागे घेणार नसल्याची भुमिका हभप गणेश महाराज शेटे यांनी घेतली आहे. वारकऱ्यांच्या या आमरण उपोषणाला भेट देण्याकरिता महाराष्ट्रातील थोर संत मंडळी येत असल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पंढरपूरचे स्वरूप आले आहे व उपोषणाला भेट देण्या साठी येत असणाऱ्या भाविकांची भोजनाची व्यवस्था अकोल्यातील भाविक मंडळी अतिशय उत्साहाने व आवडीने करीत आहे. ऊपोषणाचे पडसाद पूर्ण महाराष्ट्रभर ऊमटत असुन ईश्वरी सेने च्या सर्व पदाधिकाऱ्यांद्वारा महाराष्ट्रातील तहसील कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवेदन देण्यात आलेले आहेत. वारकऱ्यांना त्वरित न्याय न मिळाल्यास येत्या सात तारखेला सरकार वारकऱ्यांची दखल घेतली नाही. तर तीव्र आंदोलन करण्यात येईल.