चार लाखाचे पिकअप बेंबळी ठाण्याच्या हद्दितुन भरदिवसा पळवले !

0
1358
Google search engine
Google search engine

चार लाखाचे पिकअप बेंबळी ठाण्याच्या हद्दितुन भरदिवसा पळवले !


उस्मानाबाद / प्रतिनीधी

समद चाँदपाशा पठाण रा.आंदोरा ता. औसा जि. लातूर यांच्या नावे आसलेले महेंद्रा बोलेरो पिकअप क्र.एम.एच. 13 ए.एन.4367 ता.6/12/2020 ( रवीवार) रोजी उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी पोलीस ठाण्याच्या हद्दितील पाटोदा पाटिवरुन दुपारी १२ वाजेनंतर उभा असलेल्या जागेवरुन अज्ञात चोरट्यांनी जनावराच्या बाजाराजवळून धक्क्याला लावलेले पिकअप चोरून नेले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की आंदोरा ता.औसा येथील चाँदपाशा जाफर पठाण हे जणावरांचा व्यापार करतात ते खरेदी विक्रीसाठी पाटोदा पाटी येथे पिकअप घेऊन गेले होते.दरम्यान हे व्यापारासाठी जणावरांच्या बाजारात होते. त्यांच्या पाळत ठेऊन अज्ञात चोरांनी पिकअप पळवले असल्याची तक्रार पिकअप चालक राजेश विश्वनाथ कांबये यांनी बेंबळी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.कोणाला या क्रमांकाचे पिकअप अढळल्यास मो.8806187092 (चाँदपाशा पठाण) या नंबरवर संपर्क साधावा.माहिती देणाराला योग्य बक्षिस दिले जाईल.