उमरगा मल्टिपर्पज निधी लिमिटेडचे आ. चौगुलेंच्या हस्ते उदघाटन !

0
819
Google search engine
Google search engine

उमरगा मल्टिपर्पज निधी लिमिटेडचे आ. चौगुलेंच्या हस्ते उदघाटन !

हुकमत मुलाणी / उस्मानाबाद

आजच्या स्पर्धेच्या काळात बॅंकिंग व्यवहार हा विश्वास व चिकाटीने करावा लागेल . सर्वसामान्य ,गरीब व गरजू व्यावसायिक मंडळीना उदिष्ट ठेउन काम केल्यास सर्वानाच फायदा होइल असे प्रतिपादन आमदार ज्ञानराज चौगुले यांनी केले .
येथील ‘ उमरगा अर्बन मल्टिपर्पज निधी लिमिटेड ‘ उमरगा या बॅंकेच्या उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते .
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ह भ प अवधूत पुरी महाराज,हरी लवटे महाराज ,
ब्रम्हानंद महाराज , जिल्हापरिषदचे बांधकाम सभापती अभय चालुक्य ,शिवसेनेचे युवानेते किरण गायकवाड,शिवसेना तालुकाप्रमुख बाबूराव शहापुरे ,
रोटरीचे डॉक्टर लक्ष्मीकांत डिग्गीकर ,
महादेव सूर्यवंशी ,बाबूराव सुरवसे ,उपस्थित होते .

सुरवातीला फित कापून बॅंकेचे उदघाटन करण्यात आले .
यावेळी आमदार चौगुले यांनी बॅंकेच्या पदाधिकाऱ्याना शुभेच्छा दिल्या .
यावेळी अभय चालुक्य ,किरण गायकवाड ,अवधूत पुरी ,लवटे महाराज , पोलीस निरीक्षक मुकुंद अघाव ,किरण रामतिर्थे यांनी मार्गदर्शनपर भाषणातुन बॅंकेला व पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या व योग्य ते सहकार्य करन्याचे आश्वासन यावेळी दिले .

कार्यक्रमाच्या सुरवातीला प्रमुख पाहुण्यांचे शाल हार व पुष्पगुछ देउन पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले .
तर यावेळी बॅंकेचे अध्यक्ष बालाजी सूर्यवंशी , चेअरमन धनराज गिरी , सचिव संगिता गोस्वामी,उपाध्यक्ष नवनाथ कमलापुरे ,यांचा सत्कार करण्यात आला .

यावेळी मनोहर गिरी,सतीश गिरी,
लक्ष्मण गिरी ,विश्वजीत आरने ,खंडू जमादार,राम गिरी,श्याम सूर्यवंशी ,मलप्पा पुजारी,जयराम सूर्यवंशी ,मनु महाराज यांनी परिश्रम घेतले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद गिरी व आरणे गुरुजी यांनी केले तर आभार धनराज गिरी यांनी मानले .