नाशिकच्या पोलीस अधिकारी किशोर मानभाव यांचा सन्मान !

0
556
Google search engine
Google search engine

नाशिकच्या पोलीस अधिकारी किशोर मानभाव यांचा सन्मान !


उस्मानाबाद / प्रतिनीधी
नाशिक येथील विशेष सुरक्षा विभागातील अधीकारी किशोर मानभाव यांचा दि.१२/१२/२०२० रोजी उस्मानाबाद जिल्ह्यात सन्मान करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की किशोर मानभाव यांची नाशिकला बदली होण्यापूर्वी त्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद , ढोकीसह इतर ठाण्यात दबंग अधीकारी म्हणुन चांगली कामगीरी पार पाडली आहे. सध्या मानभाव यांची बदली नाशिक येथे विशेष सुरक्षा विभागाच्या सुरक्षा विभागातील पथकावर चार जिल्ह्याची जबाबदारी आहे यात नाशिक ,धुळे ,नगर ,नंदुरबार या जिल्ह्यांचा समावेश आहे .मानभाव यांच्या कामाचा आजही जिल्ह्यात सन्मान केला जातो. मानभाव यांनी ढोकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही दबदबा कायम ठेवत दबंग आधिकारी म्हणुन वेगळीच छाप निर्माण केली होती. येवढ्यावरच न थांबता त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत भिकार याच हद्दितील भिकार सारोळा येथील गरीब शेतकर्याच्या एका मुलीला व एका मुलाला शिक्षणासाठी दत्तक घेतले आहे. त्यामुळे प्रशासनाचे कर्तव्य बाजावत असताना समाजसेवा करणारे हे ढोकी ठाण्याचे ऐकमेव आधिकारी होऊन गेले. त्यामुळे किशोर मानभाव हे त्यांच्या कामानिमीत्त उस्मानाबाद जिल्ह्यात आले असता त्यांचा तेर येथील संत गोरोबा काका मंदिरात सन्मान करण्यात आला.दरम्यान तेर येथील माजीद काझी यांनी संत गोरोबाकाकांची भव्य प्रतिमा भेट देऊन सन्मान केला. तसेच मंदिर समितीतर्फे गोरोबा काकांची प्रतिमा भेट दिली .यावेळी मंदिर समितीचे पदाधिकारी माजीद काझी , पत्रकार सुभाष कुलकर्णी , हरी खोटे ,सुमेध वाघमारे , बापू नाईकवाडी कोंडचे हुकमत मुलाणी आदी पत्रकार उपस्थीत होते.


कसबे तडवळ्यातही मानभाव यांचा सन्मान

दरम्यान किशोर मानभाव यांचा उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळा येथील पत्रकार बांधवांनी सन्मान केला यावेळी तडवळा येथी पत्रकार विकास उबाळे , भागवत शिंदे ,अमर शेख , नुर शेख , आरुण निकम , सुनिल वळेकर ,सुहास सावंत यांनी सन्मान केला