उत्तर प्रदेश सीमेवर बच्चु कडू यांचा ताफा रोखला सर्व मार्ग केले बंद युपी पोलिसांची दडपशाही मध्यप्रदेश :-

0
1910

उत्तर प्रदेश सीमेवर बच्चु कडू यांचा ताफा रोखला
सर्व मार्ग केले बंद युपी पोलिसांची दडपशाही

मध्यप्रदेश :-

– केंद्रीय कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी निघालेले महाराष्ट्राचे मंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चु कडु यांच्या वाहनांचा ताफा बुधवारी (ता.9) उत्तर प्रदेश पोलिसांनी युपीच्या सीमेवर धौलपूर जवळ रोखला. युपी पोलिसांनी आता दडपशाही सुरू केली असून बच्चु कडू नवी दिल्लीत दाखल हौऊ नये म्हणून सर्व मार्ग पोलिसांनीच चक्का जामच्या नावाखाली बंद केल्याचे उघड होत आहे.

ग्वाल्हेर येथून भरतपूर मार्गे पलवलला जाण्यासाठी बच्चु कडु यांच्या वाहनांचा ताफा निघाला होता. मात्र राजस्थान आणि उत्तर प्रदेशच्या सीमेवरील धौलपूरला येताच उत्तर प्रदेश पोलिसांनी वाहनांचा ताफा रोखला,पुढे आग्रा व इतर भागात चक्का जाम असल्याचे युपी पोलिसांनी कारण पुढे केल्याने पर्यायी भरतपूर मार्गे ताफा नेण्यास सांगितले.परंतु भरतपूरपासून पुढचे सगळे मार्ग युपी पोलिसांनी स्वतःहून बंद केल्याने भरतपूरलाच गुरूद्वारात मुक्काम करावा लागला.

महाराष्ट्राचे मंत्री बच्चु कडू यांना जागो जागी जबरदस्त समर्थन मिळत आहे.त्यामुळे उत्तर प्रदेश सरकार धास्तावले असून बच्चु कडू यांना युपीत प्रवेशच मिळू द्यायचा नाही या हेतूने त्यांचे सर्व मार्ग रोखले जात आहे.उत्तर प्रदेशात दाखल होत बुधवारी (ता.9) हजारो समर्थकांचा मथुरा – वृंदावनला मुक्काम होता.मात्र आता भरतपूरला मुक्काम केल्या जाणार असून गुरूवारी (ता.10) सकाळी हजारो समर्थकांचा ताफा पलवलच्या दिशेने रवाना होणार आहे.