रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठीअकोला शहर वाहतूक शाखेची धडक कारवाई आजपर्यंत 2685 वाहनांवर दंडात्मक कारवाई मोहीम,१५ लाख रुपये दंड वसूल।

0
385
Google search engine
Google search engine
  • स्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी विशेष मोहीम

अकोलाःप्रतिनिधी

शहरात व जिल्ह्यात रस्ते अपघातात वाढ दिसून येत आहे, ह्याचे प्रमुख कारण वाहतुकीच्या नियमांचा भंग करून बेदरकार पणे वाहन चालविणे व इतर भौगोलिक कारणाने रस्ते अपघात होऊन हकनाक लोक मृत्यूमुखी पडतात, जिल्ह्यात वाढत असलेले रस्ते अपघात कमी व्हावे म्हणून पोलीस अधीक्षक जी श्रीधर ह्यांचे निर्देशा प्रमाणे मागील दीड महिन्या पासून जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके व उपनिरीक्षक सुरेश वाघ ह्यांनी वाहतूक पोलीस अंमलदार सह मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहन चालविणाऱ्या, हेल्मेट न घालता दुचाकी चालविणारे, चार चाकी चालविताना सीटबेल्ट न लावणारे, दुचाकी/चारचाकी चालविताना मोबाईल वर बोलणारे, दारू पिऊन वाहन चालविणारे, धोकादायक रित्या वाहन चालविणाऱ्या, चुकीच्या मार्गाने वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांवर धडक कारवाई करून आज पावेतो एकूण 2685 वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करून जवळपास 15 लाख रुपयांचे वर दंड वसूल केला आहे,

ज्या मध्ये मर्यादे पेक्षा जास्त वेगाने वाहन चालविणारे एकूण 470, धोकादायक रित्या वाहन चालविणाऱ्या 30, मद्य प्राशन करून वाहन चालविणारे 4, चुकीच्या मार्गावरून वाहन दा मटनारे 66, हेल्मेट न घालता दुचाकी चालविणारे 580, सीट बेल्ट न लावता चारचाकी चालविणारे 1190, वाहन चालविताना मोबाईल वर बोलणाऱ्या 280 वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली। नमूद धडक मोहीम पोलीस अधीक्षक जी श्रीधर ह्यांचे निर्देशा प्रमाणे व अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती मोनिका राऊत व उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम ह्यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गजानन शेळके व उपनिरीक्षक सुरेश वाघ व वाहतूक पोलीस अंमलदार ह्यांनी केली।

रस्त्यावरील प्राणांतिक अपघात टाळण्यासाठी वाहनचालकांनी ।मोटरवाहन कायद्याचे पालन करून अपघात टाळण्यासाठी प्रशासनाला मदत करावी असे आवाहन पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी केले आहे।