दिल्ली येथे आमदार देवेंद्र भुयार यांची शेतकरी नेते राकेश महेंद्रसिंह टिकेत यांच्यासोबत बैठक ! दिल्लीला घेरण्याचा आमदार देवेंद्र भुयार यांचा इशारा !

1911
दिल्ली येथे आमदार देवेंद्र भुयार यांची शेतकरी नेते राकेश महेंद्रसिंह टिकेत यांच्यासोबत बैठक !
दिल्लीला घेरण्याचा आमदार देवेंद्र भुयार यांचा इशारा !
मोर्शी तालुका प्रतिनिधी:
मागील १३ दिवसांपासून कृषी विधेयकांविरोधात पंजाब-हरियाणामधील शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहे. दिल्लीच्या सीमांवर शेतकरी ठिय्या मांडून बसले आहेत. आता या आंदोलनाला आमदार देवेंद्र भुयार यांनी दिल्ली येथे धडक देऊन शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
    मोदी सरकारने केलेल्या कृषी सुधारणा कायद्याविरोधात गेल्या 2 महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. मात्र, हे आंदोलन दिल्लीत येऊन धडकल्यानंतर मोदी सरकारला आता जाग आली आहे. संसदेतील बहुमताच्या जोरावर मोदी सरकारने हे तिन्ही कायदे मंजूर करुन घेतले. मात्र, रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांसमोर आता मोदी सरकारला झुकावं लागनार असल्याचे आमदार देवेंद्र भुयार यांनी सांगितले.
      शेतकरी कायद्याच्या विरोधात देशातील शेतकरी  एकत्र आले आहेत. केंद्र सरकारने केलेल्या नवीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी दिल्लीत धडक दिल्यानंतर १३ दिवसाचा कालावधी होऊनही केंद्र सरकारकडून नवीन कृषी कायदे रद्द करण्यात आले नाही .
             मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी दिल्लीच्या टिकरी बॉर्डर, युपी बॉर्डर, आणि सिंघू बॉर्डरवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना भेटून आंदोलन मजबूत करण्यासाठी दिल्ली येथील शेतकरी नेते राकेश महेंद्रसिंह टिकेत यांच्यासोबत बैठक घेऊन पुढील रणनीती आखण्यासाठी महत्वपूर्ण चर्चा करून पुढील रणनीती ठरविण्यात आली.
          “केंद्रातील भाजप सरकार दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेले शेतकरी आंदोलन बळाच्या जोरावर दडपून टाकण्याचा प्रयत्न करीत आहे . शेतकऱ्यांवर पाण्याचा मारा करून, अश्रूधूर सोडून, हायवेवर खड्डे खणून, शेतकरी नेत्यांना स्थानबद्ध करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहे. गेले 13 दिवस लाखो शेतकरी केंद्र सरकारच्या या दडपशाहीला न जुमानता दिल्लीच्या सीमेवर ठिय्या देऊन बसले आहेत. शेतकऱ्यांचे हे आंदोलन सर्व राज्यांमध्ये आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे आमदार देवेंद्र भुयार यांनी सांगितले.”
दिल्लीला घेरण्याचा आमदार देवेंद्र भुयार यांचा इशारा !
आमदार देवेंद्र भुयार यांनी शेतकरी नेते राकेश महेंद्रसिंह टिकेत यांच्यासोबत महत्वपूर्ण बैठक घेऊन आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर भाजप नेत्यांना, त्यांचे निवासस्थान आणि कार्यालयांना घेराव घालून भाजपच्या नेत्यांवर बहिष्कार घालण्याचा इशाराही देण्यात आला आहे. आता आम्ही मागे हटणार नाही. महाराष्ट्रातून अनेक शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच केले आहे. लवकरच ते दिल्लीला पोहोचतील. संपूर्ण दिल्लीला आम्ही घेराव घालू, असा इशाराही आमदार देवेंद्र भुयार यांनी दिला आहे.
जाहिरात
Previous articleआमदार  देवेंद्र भुयार  यांच्यासह शेकडो शेतकरी दिल्लीला धडकले ! 
Next articleग्रा.पं. निवडणूकीसाठी 15 जानेवारीला मतदान – जिल्ह्यात आचारसंहिता लागू