कर्मयोगी गाडगे बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त सिरसोली गावातून रामधून

0
1005

सप्तखंजिरीवादक ऋषिपाल महाराज यांचा स्थुत्य उपक्रम

अकोट प्रतिनिधी

कर्मयोगी संत गाडगे बाबा आणि संत जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त सिरसोली गावातुन रामधून काढण्यात आली. अनेक बालगोपाल आणि जेष्ठ नागरिक या रामधूनमध्ये सहभागी झाले,गावकरी मंडळींनी रामधूनच्या मार्गात संतांचे प्रतिमा ठेऊन पूजन केले.यामुळे सिरसोली गावात भक्तिमय वातावरण निर्माण झालं चित्ते,विनोदभाऊ खडसान, तेजस ठोकळ,विपुल राठोड, सागर अनासाने,रोशन घाटे यांच्यासह गुरुदेव सेवा मंडळ आणि वारकरी संप्रदायाचे अनेक सेवक प्रामुख्याने रामधूनमध्ये सहभागी झाले. रामधूनपूर्वी श्री.अशोकराव अनासाने यांनी मार्गाची स्वच्छता करून हेच गाडगे बाबांचं खरं कार्य असल्याचं सांगितलं. सप्तखंजिरीवादक ऋषिपाल महाराज अनासने यांनी रामधूनची धुरा सांभाळली.