संतनगरीत भू – मफियाचे ‘हौसले बुलंद’

0
975
Google search engine
Google search engine

दारिद्र रेषेखालील व्यक्तीच्या जागेचे अपहरण?

शेगाव :- शहरतील हार्ट ऑफ सिटी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकला लागून असलेल्या विजयकुमार अग्रवाल यांच्या ताब्यातील नझुलच्या जागेवर भूमाफिया अमोल श्रीधर ठाकरे यांनी न. प. अधिकाऱ्यांच्या साथीने माझी जागा बळकावली असे आरोप अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत लाविले.

१८ डिसेंबर २०२० रोजी स्थानिक विश्राम भवन येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान अग्रवाल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, उपरोक्त नझुलची जागा माझ्या कड़े शासनाने दिली असून माझ्या ताब्यातील जागेचा उपभोग मी सन १९८५ पासून शासकीय कर, भाडे पट्टा सगळे शासनाला जमा करीत आलो आहे. सन २००८ मध्ये विकास आराखडा मंजूर झाला. त्या अनुषंगाने नगर परिषदेने मला नोटीस देऊन ही जागा खाली करायला लावली होती, मी जेव्हा नझुल ऑफिसला व उपविभागीय अधिकारी ऑफिसला अर्ज करून विचारणा केली. त्यावेळी त्यांनी लेखी स्वरुपात असे सांगितले की, या जागेचा व विकास आराखड्याचा काहीही संबंध नाही. परंतु माझ्या या जागेवर शेगावातील भुमाफियांची नजर होती यामध्ये भूमाफिया अमोल श्रीधर ठाकरे यांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत शेळके, न. प. रचनाकार विकास कोरडे, लिपिक राजेश गावंडे, कर्मचारी गजानन पारखडे आणि नझुल ऑफिसचे आर. बी. राठोड अधिकारी आणि उपविभागीय ऑफिसचे अधिकारी यांना हाताशी धरून माझ्या या जागेवर गणपती विसर्जन २०१९ च्या रात्री संधीसाधून बळजबरीने अतिक्रमण केले मी पोलीस स्टेशनला याची तक्रार देण्याकरिता गेलो असता हजर असलेल्या कर्मचाऱ्यांनी माझी कोणतीही बाजू ऐकण्यास नकार दिला.

सदर जागा मला शासनाने उदरनिर्वाह करिता दिली असून मी वारंवार शासनाचे भाडेपट्टा व कराची भरणा करीत आलो आहे. २००९ नंतर मला २०/०२/२०२० ला उपविभागीय अधिकारी, उपअधीक्षक भुमिअधी- लेख कार्यालय शेगांव यांच्या कडून जागेचा नुतनी करणाची नोटीस आली. परंतु या अगोदरच मी प्लॉटच्या नोंदणी करणाचे कागद पत्रे व अर्ज पाठविलेले आहेत. मला न्याय द्यावा अन्यथा मी परिवारासह सार्वजनिक स्थळी येत्या २६ जानेवारीला गळफास घेऊन आत्महत्या करू असा इशाराही विजयकुमार अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिला.

शेगावातील बिघडते राजकारन

पूर्वी गावातील समस्यांचे समाधान गावकरी, मोठी मंडळी, राजकारणातील मंडळी गावाच्या वट्ट्या वर सोडवत होते परंतु असे चित्र शेगा वात होतांना दिसत नाही.
गावातील नगरसेवक, नगराध्यक्ष, आमदार हे फक्त निवडून येण्यापुर्ताच आहेत की काय असे दिसते हा राजकीय नेत्यांतील विश्लेषणाची विषय झाला आहे येवढे मात्र खरे…
काय आता अधिकाऱ्यांवर कारवाई होईल? की ते ही पडून राहील एखाद्या केरच्या पेटीत?