तहसील कार्यालयाचा सावळा गोंधळ ;मीडिया कक्षाचा फलक कक्ष मात्र नदारद

0
576
Google search engine
Google search engine

अकोट:तालुक्‍यातील सुमारे 38 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका घोषित करण्यात आल्या आहेत.निवडणूक कार्यक्रमांतर्गत विविध प्रक्रिया पार पाडली जाते आहे. या अंतर्गत तहसील कार्यालय परिसरात मीडिया कक्षाचे फलक लावण्यात आले आहे मात्र मिडीया कक्ष नदारद असल्याने निवडणूक वृत्तांकन करण्यासाठी माहिती घेणाऱ्या पत्रकारांना या चमत्कारिक कक्षाचा शोध घ्यावा लागतोय. सदर फलकावर कुठलेही जबाबदार संपर्क सूत्र नसल्याने हा फलक नुसता शोभेचा ठरत आहे. या फलकाच्या निमित्ताने तहसील प्रशासनाचा सावळा गोंधळ समोर आला आहे.विशेष म्हणजे निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांची निवडणूक कार्या संदर्भातील नाव पदनाम संपर्क सूत्रांचे फलक लावण्यात आले आहेत मात्र मीडिया कक्षाच्या फलकावर कुठेही संपर्क सूत्र नाम पदनाम नसल्याने सदर फलक शोभेचा देखावा ठरतो आहे.